वंचितांच्या अवास्तव मागण्यांनी मविला घामटा फुटणार

वंचितांच्या अवास्तव मागण्यांनी
मविला घामटा फुटणार
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 23/02/2024 :
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची कार्यपद्धती आणि मराठा आरक्षणावर दररोजच्या दररोज आलटी पलटीचा खेळ करत महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या रोषाला कारणीभुत ठरणारे हुकुमशाह मनोज जरांगे पाटील यांची कार्यपद्धती जवळपास एकच असून आंबेडकर हे महाविकास आघाडीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर तोंडघशी पाडत स्वतः मात्र वंचितचा ‘ अकेला चलो ‘ चा नारा प्रत्यक्षात अंमलात आणणार आहेत यात शंकाच नाही. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे रास्ता रोको व धरणे आंदोलन करून सरकारलाच आव्हान देऊ पाहत आहेत. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेचा बंदोबस्त का करत नाहीत ? असा सर्वसाधारण जनतेला पडलेला यक्षप्रश्न आहे.महाविकास आघाडी आता कुठे अठराव्या लोकसभा निवडणुकीत बाळसे धरू लागली आहे. त्यामुळे त्यांनी अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस जागांवर सहमती दर्शवली आहे. अर्थात कोणत्या जागा कोणाला याचा देखील फैसला झाला असल्याचे या आघाडीच्या माध्यमातून सांगितले जात आहे. पण या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाला नक्की किती जागा व कोणता पक्ष कोणत्या जागांवर देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तथापि वंचितला मविआ जास्तीत जास्त चार जागा देऊ शकते पण आंबेडकर यावर बिलकुल समाधानी असणार नाहीत. कारण त्यांना किमान दहा जागा हव्या आहेत त्यामुळे वंचित ऐनवेळी महाविकास आघाडीच्या पडिक चक्रव्यूहातून बाहेर पडून आपलं स्वतंत्र अस्तित्व राखेल यात काही शंका नाही.
मुंबईतील तीन जागांवर शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दावा आहे त्यामध्ये त्यांना सतत अवाच्या सव्वा पोपटपंची करण्यात वाकबगार असणारे विद्यमान खासदार अरविंद सावंत , संजय दिना पाटील व शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकर यांचा घोडा ठाकरे यांना दामटायचा आहे. अर्थात या तिघांचा पराभव निश्चित आहे. तर इतकेच नव्हे मुंबईतील अन्य जागांवर सुध्दा मविआला झटका बसणार आहे. त्यावेळी विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची सर्व महाराष्ट्र वाट पाहत असणार हेही तितकंच खरं तरीसुद्धा ‘ गिरे तो भी टांग उपर ‘ करत विश्व प्रवक्ते हे ईव्हीएमचा आधार घेऊन कोणत्या तरी खांबाला टेकून आपलं कौशल्य पणाला लावतील यात काही शंका नाही .
वास्तविक शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे , विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि सतत मंत्रीपदाची खुर्ची उबवणारे नगरचे नशीबवान राजकीय नेते बाळासाहेब थोरात यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब अजमावयाला काय हरकत आहे. कारण हे सगळे चवचाल नेते नेहमीच उंटावर बसून शेळ्या हाकण्यात माहिर आहेत आणि जर यदाकदाचित यांनी निवडणूक लढवली तर यातील किती जनांच्या अनामत रक्कमा वाचतील हेही जनतेसमोर येईल. परिणामी त्यांनी हे धाडस करावच नाही तर राहुल बाबा यांना यावेळी वायनाडच्या मतदारांनी बाय बाय करण्याचा निर्णय घेतला आहेच. त्यात यापूर्वीची अमेठीतील हार भलतीच जिव्हारी लागल्याने बाबा काही केल्या अमेठीच तोंड देखील पाहतील का ॽ हे देखील लवकरच कळेल. असो एकूण काय महाविकास आघाडीने कितीही आपटली तरी त्यांना महाराष्ट्रातील जनता पुरते आसमंत दाखविल्याशिवाय राहणार नाही. कारण ही आघाडी मुळात गद्दारांची आहे. परिणामी त्यांनी मतदारांनी दिलेला कौल पायदळी तुडवत अडीच वर्षे सत्तेची गाजर 🥕 खाल्ली आहेत. आता या बदल्यात मतदार त्यांच्या आघाडीला मुळासकट उपटून काढून त्यांच्या हातात धतूरा देणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
राजाभाऊ त्रिगुणे
सातारा
दिनांक -२३/२/२०२४.
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक