नाशिकला 26फेब्रु.ला “संयुक्त कर्ज, वीज बिल मुक्ती राष्ट्रीय परिषद, तर 27ला “संयुक्त इशारा मोर्चाचे आयोजन – विठ्ठल राजे पवार

नाशिकला 26फेब्रु.ला “संयुक्त कर्ज, वीज बिल मुक्ती राष्ट्रीय परिषद, तर 27ला “संयुक्त इशारा मोर्चाचे आयोजन – विठ्ठल राजे पवार
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.
अकलूज दिनांक 11/02/2024 :
नाशिक येथे 26फेब्रुवारी रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यातील विविध संघटनांच्या बरोबर “संयुक्त कर्ज, वीज बिल मुक्ती राष्ट्रीय परिषद, तर 27ला “संयुक्त इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल राजे पवार (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी (पिछडा आयोग दिल्ली) अर्थात NUBC,) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सागितली. या निमित्ताने नाशिक जिल्हा व राज्यातील सर्व समविचारी संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यानिमित्ताने त्यांनी केले आहे.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लाखोच्या संख्येने नाशिक जिल्हा कलेक्टर व विभाग आयुक्त सह एनडीसीसी बँकेला शेतकरी घेराव घालण्याचे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी दिली, ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कर्जमुक्ती आंदोलनाचे सरसेनापती भगवानराव बोराडे एडवोकेट दिलीप पाटील, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरसे, हिरामण बांदल, पंढरीनाथ कोतकर, बाळासाहेब वर्पे पाटील, शैलेंद्र कापडणीस, बालाजी जाधव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे, मात्र कृषी विभागाच्या मध्ये शेतकऱ्यांच्या नावाने राबवल्या जाणाऱ्या योजना आजही कागदावरच आहेत ! त्या कृषी योजना शेतकऱ्यांचे नावाने राज्य व केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांचा ८०%फायदा दलाल व्यापारी व एजंट साठी राबवल्या जातात. त्यामध्ये राज्य व केंद्र सरकार मधले बाबू लोकांसह राजकीय नेते शेतकऱ्यांच्या नावाने शेती कृषी योजनेचे गंगेत अर्थीक लाभात हात धुऊन घेतात असा सनसनाटी आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी केला आहे. नाशिक येथे शेतकरी कर्ज वीजबिल मुक्ती साठी आठ महिन्यां पासून सुरू असलेल्या आंदोलन स्थळी शेतकरी आंदोलकांची भेट घेतली.
त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व आंदोलना बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नाशिक व उपविभागीय सह निबंधक यांना दिले.
राजे पवार हे संयुक्त शेतकरी संघटनांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, समस्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यां बरोबर “शेतकरी संवाद यात्रा,, द्वारे संपर्क साधत आहेत. उस्मानाबाद, बीड, अहमदनगर नंतर ते नाशिक येथे शेतकरी आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले होते. कर्ज वीजबिल मुक्ती आंदोलना साठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी आंदोलक भगवान बोराडे , कैलास बोरसे, एडवोकेट दिलीप पाटील, अंबादास कोरडे पाटील, राहुल घोडके पाटील, एड विलास मोरे, पंढरीनाथ कोतकर, बाळासाहेब वर्पे पाटील, हिरामण बांदल हे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची समक्ष भेटी घेत जनजागृती करत आहेत.
नाशिक एनडीसीसी बँकेने साडेपाचशे हून अधिक शेतकऱ्यांच्या जगण्याचं साधन शेत जमीन बेकायदेशीरपणे जप्त केलेल्या साडेपाचशे शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, सातबारा वरील एनडीसीसी बँकेचे नाव काढून मूळ शेतकऱ्याच्या नावाची नोंद करा, त्यासोबत शेतकऱ्यांवरील बेकायदेशीरपणे लादलेले शेती कर्ज व विज बिल मुक्ती ची मागणी संघटनेने राज्य व केंद्र सरकारकडे संयुक्त निवेदनाद्वारे केलेले आहे. अशा आशयाचा पत्र व्यवहार राज्य सरकारकडे नाशिक, पुणे , अहमदनगर, बिड, उस्मानाबाद, जिल्हाधिकारी व नाशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे व सदर बाबतचे निवेदन संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित विभागाला लेखी पत्र द्वारे कळवले असल्याची माहिती यावेळी विठ्ठल राजे पवार यांनी दिली.