“मैदान कलेचे असो की राजकीय, डंका मोहिते पाटलांचाच”….!
संपादकीय……✍️
“मैदान कलेचे असो की राजकीय, डंका मोहिते पाटलांचाच”….!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य मोबाईल क्रमांक 98 60 95 97 64
“रूप देखनं, नजर करारी, शेला बांधला शिरी
गबाई माझा भरतार कोल्हापुरी”
“लाडाची मेहुणी, लाडाची पाहुणी,
इथे शिनगार घालून मिरवली
पाच वर्षांनी इथं कलेची जत्रा भरवली”,
“तुम्ही तिच्याकडे जायचं जरा सोडा राया मला तुम्ही जीव लावा थोडा थोडा”
“रंग महाल बदलून गेला झाला लावणीचा दरबार,
तुम्ही ऐका यारसिका सार
हो… मीनाचाय नटरंगी नार”.
“दोन दोन बायका असून मला
सुख नाही याजीवाला,
घरची बघायची कीबाहेरची
चिंता पडलीय मला”.
“चार चौघीत लाज मला वाटलीग
दोन दिवसात चोळी माझी फाटली ग”
“टपल्या चोरापासून रखवाली कराल का?,
पावना माझ्या बागेत माळी होचाल का?”
“लांबून माझा सखा गदिसलाय आलाय झिंगत झिंगत”
“मला याराघूचा लागलाय चटका
बाय… यापिंजऱ्यातून करा कीमाझी सुटका” इत्यादी आणि अशा विविधांगी स्पर्श करणाऱ्या मुजरा, छक्कड, बैठक, गण गवळण, शृंगार, जुगलबंदी, सवाल जवाब इत्यादी विविध प्रकारातील नटलेल्या, सजलेल्या, भिजलेल्या, लावण्याची तुफान बरसात शंकरनगर अकलूज च्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवनाच्या बादशाही रंगमंचकावर पाच वर्षीय खंडित कालखंडानंतर झाली. आलेल्या लाटेने लावणी रसिकांच्या जीवनातील लावणी रसाचा दुष्काळच हटला जणू! रसिक प्रेक्षक आनंदाने चिंब भिजून, हरकून, मोहरून गेले असल्याचे चित्र समक्ष दिसून आले. आणि याचे सर्व श्रेय सहकार महर्षी जयंती समारंभ समिती स्पर्धा कमिटीच्या अध्यक्षा कु स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या कुशल नेतृत्वाकडे जाते.
70 टक्के नवीन लावणी रसिक प्रेक्षक आणि तेवढाच नवीन लावणी कलावंतांचा सहभाग असूनही राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचा बाज पूर्वीच्या अखंडपणे चाललेल्या 27 वर्षीय लावणी स्पर्धेच्या तोडीस तोड होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वेळेचे भान, कडक शिस्त, नेटके परिपूर्ण नियोजन, कलावंतांचा आणि रसिकांचा प्रतिसाद सहकार महर्षि स्मृती भवनाच्या राजेशाही रंगमंचाला साजेसा ठरला हे येथे आवर्जून नमूद करीत आहोत. एवढेच नव्हे तर खास महिलांसाठी या स्पर्धेला जोडूनच पहिली रात्र बहारदार लावणीचा जागर फक्त आणि फक्त महिलांवर्गासाठी च भरवून देशातील पहिलाच महिलांसाठीचा लावणी महोत्सवी रात्री च्या पहिल्या मानाचा जन्म मोहिते पाटील घराण्यात झाला हे या ठिकाणी मुद्दाम अधोरेखित करीत आहोत. सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक, कृषी, औद्योगिक, क्रीडा, कला, साहित्य, सांस्कृतिक,आध्यात्मिक, राष्ट्रभक्ती अशा विविध क्षेत्रांना परिस स्पर्श करून सर्व क्षेत्रांचे सोनं बनविले आणि त्याचे तेज वारसांनी झळाळत, चकाकत ठेवले आहे हे शंकरनगर अकलूज येथील प्रत्येक क्षेत्रातील दिव्य भव्य कार्यक्रमांच्या आयोजनातून देशाला पहायला मिळत आहे. त्यामुळे येथील तमाम नागरिकांची छाती स्वाभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही.
महिलां कुस्ती स्पर्धा असो अगर महिलांसाठीच आयोजित केलेल्या लावणी स्पर्धा असो असे विविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पायंडा मोहिते पाटील घराण्यानेच निर्माण करावा आणि तो सक्षमपणे त्यांनीच तोलावा. आणि ही धमक फक्त आणि फक्त मोहिते पाटील घराण्यानेच निर्माण केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. मोहिते पाटील घराण्याचा विविध क्षेत्रातील असलेला वकूब आणि दबदबा नव्या पिढीने आत्मसात केलेला दिसून येत आहे. आणि याची नांदी आगामी खासदारकीच्या निवडणुकी च्या माध्यमातून लागलेली आहे. मोहिते पाटलांच्या सक्रिय सहभागातून निर्माण झालेल्या आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्या विरोधी बंडलबाज, निष्क्रिय वाचाळांचे वांझोटे प्रयत्न मोहिते पाटील यांच्या झंजावाती वादळात कितपत तग धरून राहतात हे आता स्पष्ट होईलच. घोडे मैदान जवळच आहे. येथे बुरखा पांगरलेल्या लाथाळूंना निश्चितच धूळ खावी लागणार यात वादच नाही. शेवटी एवढेच नमूद करीत आहोत की सिंहांच्या कृतीपूर्ण कार्य गर्जनेपुढे कोल्हेकुईचे भविष्य येणारा काळच सांगेल. पाच वर्षाच्या कालखंडा ची मरगळ राज्यस्तरीय लावणी स्पर्धेने एका फटक्यात मागे सारली आहे. या स्पर्धेमुळे नुसते कलाक्षेत्रच नव्हे तर राजकीय क्षेत्र देखील पुन्हा जोमाने फ्रेश होऊन आगामी वाटचालीस सक्षमपणे तोंड देण्यास तयार झाले आहे. धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांनी खासदारकीच्या आखाड्यात शड्डू ठोकून निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे. हे राजकीय युद्ध जिंकण्यासाठी माढा मतदारसंघातील नवयुवकच नव्हे तर तमाम बुजुर्ग देखील तयारीला लागलेले आहेत. मोहिते पाटील विरोधकांच्या फळीमध्ये यामुळे नक्कीच फूट पडून तीखिळखिळी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच मोहिते पाटलांचा विजय दृष्टीस येत आहे. पदावर असणारे नुसतेच डोमकावळे ठरले आहेत हेसुज्ञ मतदारांनी जाणले आहे. त्यामुळे पदावर नसताना देखील सर्व क्षेत्रातील विकास साधण्याच्या दृष्टीने अहोरात्र कृती पूर्ण परिश्रम करणारे मोहिते पाटील घराण्यातील सर्व मोहरे दिवस रात्र परिश्रम घेत आहेत. मोहिते पाटलांमुळे मतदार संघाचा विकासच होत आलेला आहे. तोटा कोणताच दिसत नाही. मग मोहिते पाटलां व्यतिरिक्त ऐरा गैरा निवडून देऊन माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास वाऱ्यावर कशासाठी सोडून द्यायचा? अशी उघड उघड चर्चा मोहिते पाटील विरोधकांमध्ये देखील होताना आढळते. आणि हीच चर्चा मोहिते पाटील यांच्या यशाची नांदी ठरू लागली आहे. मीमी म्हणणारे विविध क्षेत्रातील विरोधक देखील मोहिते पाटील यांच्यासाठी नव्या जोमाने नव्या दिराने मोहिते पाटील यांच्या पाठीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उभे ठाकलेले यानिमित्ताने स्पष्ट होत आहे आणि “मोहिते पाटील हाच आमचा पक्ष आणि मोहिते पाटील हाच आमचा उमेदवार” अशा निर्धाराने माढा लोकसभा मतदारसंघ पेटून उठला आहे. याची दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील सर्वांना घ्यावीच लागणार आहे. सद्यस्थितीत मोहिते पाटील यांना डावलून होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरे जाण्याचा अट्टहास भाजपा खचितच करणार नाही असे वाटते. राज्यस्तरीय लावणी स्पर्धेच्या निमित्ताने ओघाने समयोचित विषयांतर होत गेले याची जाणीव ठेवून संपादकीय थांबवितो.