ताज्या घडामोडी

एकेला देवेंद्र क्या करेगा ? यापेक्षाही एकट्या राऊतांनी काय केलं ते बघा !

एकेला देवेंद्र क्या करेगा ? यापेक्षाही एकट्या राऊतांनी काय केलं ते बघा !

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 11/02/2024 :
महाराष्ट्रातील सुसु अर्थात खासदार सुप्रियाताई सुळे या महाविकास आघाडीच सरकार असताना एकेला देवेंद्र क्या करेगा ? असा उपरोधिक टोला सातत्याने त्यावेळचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावून त्यांचा जागोजागी अवमान करतं आपल वक्तृत्व कौशल्य किती अमाप आहे अशा तोऱ्यात वावरत होत्या. त्याच एकेला देवेंद्र यांनी उध्दव ठाकरे यांच्या पिताश्रींनी अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वकष्टाने स्थापन केलेला शिवसेना नावाचा पक्षच उध्दव ठाकरे यांच्या नाकाखालून पळवलाच नाही तर त्या पक्षाच नाव व धनुष्यबाण नावाच चिन्ह सुध्दा पळवल.त्यावेळी सुप्रियाताई सुळे यांचा तिळपापड झाल्याने त्या फडणवीस यांच्या विषयी वाट्टेल त्या भाषेत अक्षरशः बरळत वेड्या पिशा झाल्या होत्या. कारण त्यांना माहित होतं यदाकदाचित हीच वेळ त्यांच्या पक्षावर आली तर यालाच म्हणतात ‘ मन चिंती ते वैरी न चिंती ‘ बघा नियतीचा खेळ कसा चालू झाला आहे.
नियतीने एकदा सूड घ्यायचा ठरवला की ती वेळ काळ काही बघत नाही सगळं कसं व्याजासह परत करायला लावते हे खासदार सुप्रियाताईंना थोडीच माहित असणार ? कारण त्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्या त्यामुळे राजकारणाचा गाडा एकदा का उलटा फिरायला लागला की कसं होत्याच नव्हतं होत हे आता कुठ त्यांना कळायला सुरुवात झाली आहे.उध्दव ठाकरे यांच्या बापाने किमान त्यांचा शिवसेना नावाचा पक्ष १९ जून १९६६ रोजी स्थापन करू तो कष्टाने उभा केला होता पण सुळे यांच्या भाषेत त्यांच्या पिताश्रींनी म्हणजे बापाने कधी पक्षच उभा केला नाही तर त्यांनी निवडून येणाऱ्या आमदार व खासदारांची मोट बांधून त्यावर आपली हुकूमत गाजवत महाराष्ट्रातील राजकारणाचा पुरता चुथडा केला. त्यावेळी इतरांच्या घरात पवारसाहेबांनी जो राजकीय दरोडा टाकला त्याला खासदार सुप्रियाताई सुळे काय उपमा देणार.
सुप्रियाताई सुळे यांच्या बापाने केलं ते सार काही पुण्य होत आणि देवेंद्र फडणवीस यांनी केल ते पाप होत का याच अवलोकन करण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. कारण ही किमया विश्व प्रवक्ते व राजकारणातील पक्ष देशोधडीला लावण्यात तरबेज असलेले खासदार संजय राऊत तथा रघुवीर नावाच्या जादुगाराने केली आहे. इतक सार घडून देखील हे रघुवीर नावाचे जादुगार शांत बसतील तर ते कसले विश्व प्रवक्ते ? तर या संजय राऊत यांच्या वाचाळपणाला कंटाळून एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातातून धनुष्यबाण नावाच राजकीय हत्यार तर काढून घेतलंच, शिवाय पक्षाच शिवसेना नाव देखील अधिकृतरित्या काढून घेतलं तरी यांचा सत्तेसाठीचा सातव्या मजल्यावर असलेला माज काही केल्या खाली उतरायला तयार नाही. म्हणून सतत आमची पण सत्ता येईल या भ्रमात राहून ते जनतेला मुर्खाच्या नंदनवनात पाठवण्याचा निर्लज्जपणाचा कळस गाठत आहेत.
जी अवस्था उध्दव ठाकरे यांच्या उर्वरित शिल्लक शिवसेनेची त्यापेक्षा वेगळी अवस्था उर्वरित शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसची अजिबात नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांची बहुदा ही शेवटची लोकसभा आणि विधानसभा निवडणुक असेल कारण आता या पक्षांना स्वतःचे कार्यालय नाही तसेच पक्ष चालवायला चलनी नोटा सुध्दा नाहीत कारण आजपर्यंत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्र अक्षरशः धू धू धूतला पण त्या धूतलेल्या पैशाचा वापर कोणत्याही निवडणुकीमध्ये किमान उध्दव ठाकरे यांनी केल्याचे एखादे उदाहरण कुणीतरी सांगायला हवं पण तसं अजिबात नाही. कारण यांच राजकारण म्हणजे ‘तुझं ते माझंच आणि माझ ते सुद्धा माझंच’ ! या धर्तीवर सतत चालू असतं यात काही बदल होईल असे वाटत नाही. त्यामुळे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत किंवा मातोश्रीवरचे चांडाळ नेते हे निवडणुकीत आपल्या खिशाला चाट लावून घेतील हे विसरून जा. म्हणून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राजरोसपणे मेघा भरती चालू आहे. कारण तिथे निवडणुकीसाठी नोटा पण आहेत आणि निवडून येण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी देखील आहे.
दुसरीकडे शरदचंद्र पवारसाहेब यांनी जो काही राजकीय घरफोड्या करून हजारो कोटी रुपयांचा मलिदा खाल्ला असल्याची चर्चा आहे. त्या मलिद्याच करायचं काय ॽ कारण हा मलिदा देऊन बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत केंद्र स्थानी असलेल्या मतदार विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांना मतदान करील याची सूतराम शक्यता नाही. कारण या मतदारांना शरदचंद्र पवारसाहेब यांचा निवडणुकीनंतर पराभव खिशात घालून स्वतःची टिमकी वाजवणारा चेहरा बघायचा आहे. तरच स्वर्गवासी झालेल्या अनेकांच्या आत्म्याला शांती मिळेल. यालाच म्हणतात ‘ जैसी करणी वैसी भरणी ‘ दुसरं काय ! आणि हो महाविकास आघाडीच्या बाजूने मखलाशी करणाऱ्या पेड पत्रकारांकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण या आघाडीचा दारुण पराभव होईल त्याच क्षणी हीच मंडळी ईव्हीएमच्या नावाने गल्ली बोळातल्या सतत चंद्रावर असणाऱ्यांना सुध्दा लाज वाटेल इतक्या निर्लज्जपणाचा कळस गाठत भुंकत बसतील. त्यात अर्थात आघाडीवर विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत असतील यात काही शंका नाही.

राजाभाऊ त्रिगुणे
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button