फक्त मोर्चे मेळावे घेऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही,त्यासाठी नेत्यांनी दिल्लीला आमरण उपोषणाला बसावे — सचिन ढगे

फक्त मोर्चे मेळावे घेऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही,त्यासाठी नेत्यांनी दिल्लीला आमरण उपोषणाला बसावे — सचिन ढगे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 04/02/2024 :
निवडणुका जवळ आल्या बरोबर काही नेते लागले धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजाला एकत्रित करून आपल्या पक्षाच्या आदेशावरून आता लागेल मेळावे घ्यायला ,आणि करेल समाजाचा लिलाव याचीच जास्त भीती समाजाचा मनात आहे. आम्ही मेंढर मेंढर दर पाच वर्षा ने होते आमचा लिलाव लिलाव असे आता व्हायला नको. अशीच आता समाजात चर्चा आहे. आता पर्यंत धनगर आरक्षण अमल बजावणीचा प्रश्न कोणी रेंगाळत ठेवला? 70 वर्षा पासून का सोडविण्यात आला नाही? आता पर्यंत सत्ता कोणाची होती? धनगर आरक्षणाला विरोध कोणाचा होता?मग जे सत्तर वर्षात धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही,ते आता काय सोडविणार?आता पर्यंत यांना आपला आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणी रोखले होते काय? यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा येवढाच पुळका येत असेल तर हा प्रश्र्न सोडविण्या साठी आता यांच्या जवळ कोणते व्हिजन आहे, कोणती रणनीती यांनी आखली आहे,या बाबत समाजालां माहिती द्यावी. राहिला प्रश्न मेळावा,आंदोलन,मोर्चे हे या पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात करून पाहिले,परंतु त्याचा काहीच फायदा समाजाला झाला नाही.परंतु नेत्यांना झाला.”नेते तुपाशी,समाज उपाशी” असे झाले. म्हणून आता असे होऊ नये,असे आम्हाला वाटते,समाजाला खरंच आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर या समाजातील नेत्यांनी महाराष्ट्रात गोंधळ करण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आमरण उपोषणाला बसावे.त्यामुळे संपूर्ण देश्याचे लक्ष आपल्या कडे लागेल.त्या मुळे आपल्याला काही तरी फायदा होईल.येथे महाराष्ट्रात तुम्ही काहीही केले तरी त्याला काहीच अर्थ नाही.कारण “दिल्लीचे नाक दाबल्या शिवाय महाराष्ट्राचे तोंड उघडत नाही”.
पटत असेल तर दिल्लीला उपोषणाला बसा. आम्ही तुमच्या सोबत राहू. नाहीतर, फक्त आंदोलन, मोर्चे,मेळावे घेऊन समाजाला बेवकुब बनवणे आता तरी सोडा.आता निवडणुका जवळ आल्या म्हणून एखाद्या पक्षा कडून पैसा घेऊन, आरक्षणाच्या नावावर समाजाला एकत्रित करून समाजाचा मेळावा घेऊन त्या पक्ष्याला समाज विकण्याचे काम आता होऊ नये म्हणजे झाले. नाहीतर “रात्र भर जागले, हाती काहीच नाही लागले” अशी समाजाची गत होईल, पटत असेल तर बसा दिल्लीला आमरण उपोषणाला त्यामुळे…
आपला प्रश्न सुध्दा मार्गी लागेल, आणि तुमची सुध्दा फुकटात प्रसिद्धी होईल. तेव्हाच तुम्ही समाजाचे रियल हिरो व्हाल.पटत असेल तर बघा आणि थोडा समाजाच्या नेत्यांनी जरांगे पाटला कडून काहीतरी शिकावें.
जय मल्हार,जय अहिल्या देवी.
जय क्रांती.
“परिवर्तन हमारा नारा है, सारा समाज हमारा है”
सचिन ढगे ,अध्यक्ष मल्हार फाऊंडेशन.