श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.
अकलूज दिनांक 03/02/2024 :
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये संग्रामनगर येथे आयोजित केले आहे. या सात दिवसीय शिबिरानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संग्रामनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी आयोजित केलेल्या आरोग्यविषयक शिबिराचे उद्घाटन शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सविता गुजर यांच्या हस्ते शिबिर प्रमुख डॉक्टर भारती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्रमासाठी डॉ. ऋषी गजभिये, डॉ. छाया भिसे, डॉ. सायली चंदनशिवे, रमजान शेख, विश्रांती पाटील, सुमित कोळवले, अंगणवाडी सेविका रंजना दुपडे, वंदना नायकुडे, विद्या गाडे, लता गायकवाड,व मदतनीस उज्वला रेवंडे इत्यादींनी परिश्रम घेतले.
संरक्षित अन्नपदार्थ व पोषक भरड धान्य व्याख्यान व प्रदर्शन, एल.पी.जी गॅस सुरक्षा, भरतकाम या विषयावरील कार्यशाळा आणि गर्भवती व स्तनदा मातांचा आहार , बालकांसाठी सृजनात्मक खेळ. त्याचबरोबर विविध विषयावर पथनाट्याचे सादरीकरण, जलसंरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षणाचे महत्त्व या विषयावर जनजागृती रॅली, वृक्षारोपण व परिसर स्वच्छता, पर्यावरण पूरक उपक्रमाअंतर्गत माती विरहित शेती, स्वयंपाक घरातील कचरा व्यवस्थापन, इत्यादी विषयांवर उपक्रमांचे आयोजन केले आहे.
जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर येथे सात दिवसापासून सुरू असलेल्या शिबिराचे उद्घाटन सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी संग्रामनगर ग्रामपंचायत सरपंच अजित रेवंडे यांच्या हस्ते उपसरपंच आशा सावंत, मुख्याध्यापक घुले यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. उद्या रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर येथे शिबिराचा समारोप होणार आहे.