श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथे भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथे भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 31/01/2024 :
राष्ट्रीय ओबीसी आयोग महाराष्ट्र राज्याच्या संपर्क व प्रसिद्धी प्रमुख पदी जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर प्रथमच त्यांनी श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, करंजे (तालुका बारामती, जिल्हा पुणे) येथील द्वापार युगीन काळातील जागृत देवस्थान शिवालयातील स्वयंभू श्री शिवलिंगाचे दर्शन घेतले.
करंजे येथे देवस्थानचे पुजारी माजी चेअरमन मोहन मुरलीधर भांडवलकर यांनी सर्वप्रथम आपल्या निवासस्थाना समोर पत्रकार नायकुडे यांचे स्वागत करून अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.”शिवशक्ती भक्त आणि पत्रकार असलेले आमचे सहकारी मित्र नायकुडेदादा यांची “एनयुबीसी”अर्थात नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटीज वर महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख व संपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाली याबद्दल आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटत आहे. योग्य निवड केल्याबद्दल राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष नामदार जगदीश यादव, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी एस. गीता आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांचे देवस्थानचे पुजारी मोहनराव भांडवलकर यांनी आभार व्यक्त करीत त्यांना धन्यवाद दिले.
स्वयंभू श्री शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थानचे पुजारी माजी चेअरमन रामदास बबन भांडवलकर यांनी देवस्थानच्या वतीने मानाचे श्रीफल आणि प्रसाद देऊन पत्रकार नायकुडे यांचा सन्मान करून अभिनंदन केले. याप्रसंगी संतोष विठ्ठल गायकवाड, प्रमोद जगन्नाथ धांडोरे, अमोल विश्वास काटे, सुनील धाईंजे, तेजस बंडू कांबळे, महेश जगताप, रोहित रमेश जाधव, नामदेव सावंत, शामराव भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.