विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणजे मारीच राक्षस ?

विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणजे मारीच राक्षस ?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 13/01/2024 :
“नाय दिसलं कुणाचं तर बडव गुरवाच” अशी आख्यायिका आपल्याकडे सुपरिचित आहे अगदी तशीच आख्यायिका उर्वरित शिल्लक शिवसेनेत उदयाला आली आहे. त्यामुळे विश्व प्रवक्ते यांचा कधी राजकीय नायनाट होतोय याची वाट अनेक शिवसैनिक मनापासून आणि तितक्याच मनोभावे बघत आहेत. असो विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत काय त्यांच्यापेक्षा एकाहून एक अवलिया नग आजकाल उध्दव ठाकरे यांच्या दिमतीला राजरोसपणे असतात यात काय नवल नाही. कारण या अवलियांना उध्दव ठाकरे कधीही आतून सोडा बाहेरून देखील कळले किंवा वळले नाहीत. त्यामुळे त्यांची झटपट पैसे कमवण्याची सुप्त ओढ काही केल्या लपत नाही. परिणामी आज एक अवलिया ईडीच्या रडारवर असतो तर उद्या दुसरा. हा असाच सिलसिला सातत्याने सुरू राहणार. मग त्यांनी नाशिकमधील काळा राम मंदिराला अकरा प्रदक्षिणा घालो अथवा सतत प्रदक्षिणाचा रतिब लावो. यांच्यात त्यामुळे किंचित सुध्दा सुधारणा होणार नाही. कारण स्वतः श्रीरामाने या मंदिरात अनेक दिवस मुक्काम केला होता ही आख्यायिका ते जाणीवपूर्वक विसरतात. तथापि त्यांच्या मनात ‘ मुंह में राम और बगल में छुरी ‘ असाच अंतर्गत प्रकार सुरू आहे.
तर अशा जगाने ओवाळून टाकलेल्या उर्वरित शिल्लक शिवसेनेला आणि त्याहूनही त्यांच्या नेत्यांना श्रीराम कधी सुबुद्धी सोडा पण ऐनकेन प्रकारची साधी नवलखा बुध्दी सुध्दा देणार नाही. कारण यांची तितकी पात्रताच नाही किंवा ते त्या पात्रतेला पात्र देखील होऊ शकत नाही.आता बघा यातले विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे पात्र त्यांनी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टिंगलटवाळी करताना त्यांचा उपमर्द केला पण भाषा काय होती तर ते म्हणे देवेंद्र काय तो ( Shuparnakha ) आहे. का मग रश्मी वहिनी ठाकरे यांच्या द्रष्ट्या पगारी नोकर असलेले खासदार संजय राऊत काय सोन्याचे हरिण असलेले मारीच राक्षस आहेत का ॽ हां याच उत्तर मिळालच पाहिजे. कारण खासदार संजय राऊत यांच्या नंतर ते अगडबंब खासदार त्यातील एक कोकणातील विनायक राऊत यांच्या नावातच फक्त विनायक आहे बाकी सगळं आतून बाहेरून काळाकळीत व तितकीच बटबटीत भाषा तसंच अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांच तर बोलायलाच नको इतका हा बाष्कळ माणूस आता यंदा यांची आतापर्यंतची अवलादी दादागिरी संपवण्याचा चंग काॅंग्रेस मध्ये असलेल्या मिलींद देवरा यांनी बांधला असून परिणामी सावंताची पाचावर धारण बसवली आहे. आता धारण आणि त्यातून उडणारी गाळण सावंताना मातोश्रीवरचे दार बंद करण्यासाठी पुरेशी आहे. असो अशा अवलियांच्या खोगीरभरतीत आमच्या सुषमा अक्का यांचा भाव आजकाल चांगलाच वधारला आहे कारण त्यांना कोणतीही निवडणूक लढवायची नाही. फक्त माल गोळा करायचा आहे. त्यामुळे त्या पोपटपंची करण्यात माहीर असल्या तरी त्यांचा परंपरागत अभ्यास कच्चा नसल्याने त्यांनी आपली निवडणूकीतील अनामत राखून ठेवत झाकली मुठ विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या प्रमाणे अजूनही उघडली नाही आणि पुढेही ती मुठ उघडण्याचा साधा प्रयत्न सुध्दा करणार नाहीत. कारण या दोन राजकीय नतद्रष्टापणा करणाऱ्यांना आपली समाजातील एकूण औकात माहिती आहे. असो तो त्यांचा व्यक्तिगत पातळीवरील विषय त्यात मी ज्ञात पाजळण औचित्यपूर्ण नक्कीच नाही.
राजाभाऊ त्रिगुणे
पत्रकार जेष्ठ राजकीय विश्लेषक