ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या विविध समस्यांविषयी प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या निवासस्थानी संघटनेची भेट

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 10/01/2024 :
सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे निवासस्थानी शेतकरी संवाद यात्रेच प्रमुख व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांचे डॉक्टर श्री व सौ सबनीस यांनी स्वागत केले.सध्या राज्यात 8 जानेवारी 2024 पासून सुरू असलेला “सरकारच्या निर्यात बंदी विरोधात शेतकऱ्याची बाजार बंदी शेतकरी संप आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी सर्व बाजार समिती वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते यांची समक्ष भेट घेऊन आंदोलनाची भूमिका समजून सांगत शेतकरी संपत सहभागी होण्यासाठी विनंती करताना व शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्याचा दौरा करत असताना डॉ सबनीस यांच्या निवासस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी आंदोलनाचे नेते विठ्ठल दादा राजे पवार यांनी शेतकरी संप आंदोलनाची भूमिका सांगण्यासाठी त्यांची भेट घेतली व शेतकरी बंद आंदोलनाच्या विषयी संघटनेच्या भूमिकेविषयी माहिती दिली. त्यावेळी डॉक्टर सर्विस या त्यांचा सत्कार केला यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वर्पे उपस्थित होते.

यावेळी राजे पवार म्हणाले की शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व समविचारी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती केली आहे दिनांक 11 जानेवारी रोजी डॉक्टर बाबा आढाव तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे व शेतकरी संप आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेणार आहेत. आज शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्याची टीम मनोज पाटील जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे पोहोचणार आहे हे टीमचे नेतृत्व संघटनेचे मराठवाडा विभागाचे युवक अध्यक्ष राहुल घोडके पाटील करणार आहेत अशी माहिती यावेळी विठ्ठल पवार राजे यांनी दिली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button