ताज्या घडामोडी

श्री सन्मती सेवादलातर्फे आठवा राज्यस्तरीय जैन वधू-वर-पालक परिचय मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न

श्री सन्मती सेवादलातर्फे आठवा राज्यस्तरीय जैन वधू-वर-पालक परिचय मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 10/01/2024 :
श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था अकलूज महाराष्ट्र राज्य वतीने आठवा राज्यस्तरीय जैन वधू-वर-पालक परिचय मेळावा दि.07/01/2024 रोजी कांतीलाल सांस्कृतिक भवन,अकलूज येथे संपन्न झाला. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत सालाबादप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करून 39 रक्तदात्यांचे रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था,अकलूजचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी व सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी यासाठी परिश्रम घेतले. या मेळाव्यासाठी २३२ संभाव्य वर व २१५ वधू उमेदवारांचा सहभाग होता.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशिल मोहिते पाटील, चंदुकाका सराफ चे किशोरभाई शहा, उद्योजिका सुजाता शहा, सराफ असोसिएशनचे सुहास शहा, सत्यजित दोशी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात सन्मती महिला मंडळ, अकलूज यांच्या मंगलाचरणाने झाली.
भगवान महावीर व प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिपप्रज्वलन प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यक्रमाचे ऊद्घाटन झाले.
प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहीरभाई गांधी यांनी केले. माजी अध्यक्ष व संचालकांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांनाचा स्मृतीचिन्ह व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व मान्यवरांच्या हस्ते वधू वर पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करीत असताना चंदुकाका सराफचे किशोर शहा यांनी सांगितले की,उमेदवारांनी जास्ती अपेक्षा न ठेवता लवकर विवाहबद्ध व्हावे तसेच विवाहासंदर्भातील विविध पैलू उलगडले. उमेदवारांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
उद्योजिका सुजाता शहा यांनी उमेदवारांनी विवाहापश्चात एकमेकांना समजून घेऊन संसार सुखाचा करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सुहास शहा यांनी आपल्या खास खुमासदार शैलीमध्ये आपले अनुभव व्यक्त केले. मुलींनी ग्रामीण भागात देखील चांगले व्यवसाय करणारे उमेदवार असून शहरी भागात लग्न करण्याचा आग्रह ठेऊ नये असा सल्ला दिला. डॅा. सतीश दोशी यांच्या वतीने सत्यजित दोशी यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, जैन समाजाने फक्त व्यापार न करता विविध प्रकारच्या उत्पादनांच्या निर्मीती मध्ये काम करावे असे सांगितले. तसेच मागील वधू वर मेळावा मध्ये लग्न जमलेले उमेदवार यांनी एक मुलगी किंवा दोन मुलीहून थांबण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा सन्मती सेवा दलाने सत्कार ठेवावा. तसेच मिहीर गांधी यांनी समाजासाठी करित असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. समाजासाठी राबवता येऊ शकत असलेल्या कल्पना मांडत मार्गदर्शन केले.


ज्येष्ठ श्रावक अरविंद फडे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. “समाजरत्न” उपाधी देऊन त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून सन्मती सेवा दलाच्या वतीने करण्यात आला.
सुत्रसंचालन व युवक युवतींचे परिचय वाचन प्रथमेश कासार, सौ.सारिका गांधी, शशिन चंकेश्वरा व प्रा.मनीष शहा यांनी केले.
माजी अध्यक्ष नवजीवन दोशी यांनी आभार व्यक्त केले.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष जिनेंद्र दोशी, नवजीवन दोशी, मयुर गांधी, विरकुमार अनंतलाल दोशी, सरपंच सदाशिवनगर , डॉ. राजेश शहा, संदेश गांधी पदाधिकारी भरतेश वैद्य, निनाद चंकेश्वरा, विरेंद्र दोभाडा, नितेश फडे, केतन दोशी, श्रीकांत शहा, रत्नकुमार फडे, संदीप शहा, योगराज गांधी, सुरेंद्र दोभाडा, योगेश गांधी, अरिहंत फडे, प्रविण दोशी, निरज व्होरा, संतोष दोशी, शशिकिरण देशमाने,अमित शहा, विशाल गांधी, नमन गांधी, सम्मेद शहा, अक्षय दोशी प्रणील दोशी, अक्षय फडे, विजय गांधी, रोहित गांधी, कल्पेश गांधी, पंकज व्होरा, पियुष दोशी, आदित्य दोशी, तेजस गांधी, निलेश दोशी, यशराज गांधी, मयुर शहा, नितेश दोशी, अमोल गांधी, वृषल गांधी, सोहन गांधी व संचालक मंडळ यांनी गेले महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेतले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button