ताज्या घडामोडी

⭕डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती असल्याची माहिती

⭕डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती असल्याची माहिती

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

पेठवडगाव कोल्हापूर दिनांक 18/12/2023 :
डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीतील (Karachi) एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती आहे. एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत चिंताजनक झाल्यानं त्याला रूग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मिडियाद्वारे कळते आहे. मात्र यासंदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून कुठल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आली नाही. मात्र ही बातमी सत्य असल्याची शक्यता एवढ्यासाठी बळावते आहे कारण कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमधे इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मुळात पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे मान्य केलेले नाही. त्यामुळे त्याच्याशी संबंधित कुठल्याही वृत्ताला पाकिस्तान सरकार कधीच दुजोरा देत नाही. यावेळी दाऊदच्या प्रकृती बिघडण्याचे कारण विष प्रयोग सांगण्यात येत आहे. मात्र नेहमीप्रमाणे याबाबत कमालीची गुप्तता पाळल्यामुळे यासंबंधी अनेक गोष्टी स्पष्ट होत नाही. दाऊद हा भारतासाठी मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. अमली पदार्थाचे तस्करी, संघटित गुन्हेगारी तसेच १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी तो भारताला हवा आहे. या बॉम्बस्फोटात २५० नागरिक ठार झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून तो फरार असून, त्याला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. कराचीमधील त्याचा घराचा पत्ता देखील भारतीय गुप्तहेर संस्थांनी शोधून काढला होता.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button