उच्च ध्येय ठेवा, कष्ट करा आणि यशस्वी व्हा – मदनसिंह मोहिते पाटील

उच्च ध्येय ठेवा, कष्ट करा आणि यशस्वी व्हा – मदनसिंह मोहिते पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 19/12/2023 :
येथील सदाशिवराव माने विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना चे विशेष श्रमसंस्कार शिबिर चौडेश्वरवाडी येथे उत्साहात संपन्न झाले. तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत असते. माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केली जातात असे मत सांगता समारंभाचे प्रमुख अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मानसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
प्रस्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत चौंडेश्वर वाडी तालुका माळशिरस येथे संपन्न झाले. विद्यालयातील 50 स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, स्मशानभूमीची स्वच्छता, तसेच एक लाख लिटर क्षमतेचे दोन वनराई बंधारे बांधले. याचा फायदा गावातील स्वच्छता, आरोग्य सुधारण्यास तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढवून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम या स्वयंसेवकांनी या कालावधीत केले.
सात दिवस विविध विषयावर तज्ञांची व्याख्याने आयोजित केली होती. यावेळी स्वयंसेवक महेक शेख, समृद्धी पवार या विद्यार्थिनींची व संजय जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी चौडेश्वरवाडी गावच्या सरपंच सौ. अलका शिवाजीराव इंगवले -देशमुख, उपसरपंच अनिल कोहिले, ग्रामपंचायत सदस्य नितीन साखळकर, ग्रामसेवक अशोक सावंत, गावातील ग्रामस्थ, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य रणववरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी संग्रामसिंह भांगे, तानाजी महाडिक, संजय जाधव व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झाकीर सय्यद व आभार स्नेहा पिसे हिने मानले .