“शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिले देण्यासाठी ओंकार परिवार कटिबद्ध” : चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील

“शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिले देण्यासाठी ओंकार परिवार कटिबद्ध” : चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 17/12/2023 :
या अगोदरच ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक ने 1 नोव्हेंबर 23 ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या कालावधीत ओंकार कारखान्यात गळीतास आलेल्या उसाला पहिला हप्ता 2700 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.16 नोव्हेंबर2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत गळीतास आलेल्या उसाची दुसऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांची व ऊस वाहतूकदारांची बिले ज्यांचे त्यांचे खात्यावर बँकेत जमा करण्यात आली आहेत.”शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात वेळेत ऊस बिले देण्यासाठी ओंकार साखर कारखाना परिवार कटिबद्ध आहे असा ठाम निर्धार ओंकार साखर कारखाना लि., चांदापुरी चे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमां समोर बोलताना व्यक्त केला. पुढे बोलताना, या कारखान्याचे विस्तारीकरण व उपपदार्थ प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती करीत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो याची मला जाणीव आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांना जे देणे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करू तरी शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा असे आवाहन बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले. याप्रसंगी ओंकार परिवाराच्या संचालिका सौ रेखाताई बोत्रे पाटील, संचालक प्रशांत बोत्रे पाटील, जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
वेळेच्या वेळी ऊस बिले बँकेत खात्यावर जमा होत असल्याने ऊस उत्पादक, ऊस तोडणी मजूर व ऊस वाहतूकदार या सर्वांमध्ये विश्वास पूर्ण समाधानाचे वातावरण निर्माण झालेले असून ओंकार परिवारासाठी धन्यवाद व्यक्त होत आहेत.