ताज्या घडामोडी

पाडळसरे धरणाला सुधारीत प्रशासकीय मान्यता

पाडळसरे धरणाला सुधारीत प्रशासकीय मान्यता

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 17/12/2023 :
पाडळसरे धरणाला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली असून  ₹ 4,890 कोटी सरकारने मंजूर केले. गोष्ट आनंदाची आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्री मंडळात भाजपचे नाथाभाऊ खडसे पाट बंधारे खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात तापी खोरे जल सिंचन योजना मंजूर झाल्या. त्यात तापीवर सर्वं बॅरेजेस आणि पाडळसरे धरणं मंजूर झाले होते. नार गिरणा लिंक होती. त्यांची कामही सुरु झाली होती. पण सरकार बदलले आणि त्यांनी पाडळसरे धरणाचे तीन तेरा वाजवले. धरणाची उंची आणि साठवण क्षमता निम्यावर आणली. तें अर्ध्या क्षमतेच धरणंही अर्धच ठेवलं. त्याच्या पुढे जाऊन धरणा वरील कच्चा माल, लोखंड, सिमेंट, खडीही उचलून नेलं आणि धरणाचं काम रखडल. हे रखडलेलं काम पूर्ण व्हावं म्हणून अंमळनेरचे सुभाष आण्णा चौधरी आणि त्यांचे सहकारी लढत राहिले. गिरणा नार लिंकसाठी बाबा अहिरे आणि त्यांचे सहकारी लढत राहिले. त्यांना कल्याण मधून उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी साथ दिली. यां सर्वांनी एकत्र येऊन चळवळ सुरु ठेवली. तसेच स्थानिक खासदार उन्मेष पाटील, मंत्री गिरीशभाऊ महाजन, गुलाबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, दादा भुसे यांनीही सभागृहात काही मागणी केली असावी, त्याच प्रमाणे अनेक ज्ञात अज्ञात जल योध्याच्या प्रयत्नातून त्या लढ्याला आज यश आले आणि पाडळसरे धरणा साठी सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्या मान्यते प्रमाणे सरकारनें पाडळसरे धारणाला 4,890 कोटी रुपये मंजूर केले. तापी भुराई प्रकल्पलाही दोन हजारावर रुपये मिळाल्याच सांगितले जाते. या सर्वं लढणाऱ्या सेनानीचे अभिनंदन!सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणजे का? यां प्रकल्पच काम पूर्ण करायला सध्याच्या बाजार भावा प्रमाणे जो खर्च येईल त्या खर्चाची रक्कम सरकारला मान्य आहे. हे धरणं बांधलं जावं याच्यासी सरकार तत्वत: सहमत आहे. आवश्यक तेवढा पैसा सरकार पुरवेल. एवढाच याचा अर्थ आहे. म्हणजे चार हजार कोटी रुपये पाडळसरे धरणाला मिळाले असं नाही. तें पैसे पदरात पाडून घेण्यासाठी सर्वं खान्देशी जनता, लोकप्रतिनिधी, यांनी आता जागृत राहून हा पैसा ओढून आणला पाहिजे. तसा तों मिळाला म्हणजे आपण जिंकलो असा त्याचा अर्थ आहे. तों पैसा आपण मिळवीला नाही तर, मना मामान्या शंभर गाई सकाय उठी काई नां माई!
या बरोबरच कसमादेना पट्ट्यासह सर्वं खान्देशचीं एकजूट कायम ठेवावी लागेल. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळवयाच्या आहेत. नारपार गिरणा लिंक. त्यासाठी मांजरपाडा 2 धारणाची पूर्तता. वांजुळ पाणी प्रकल्प. गिरणा नदी सोबतच केमच्या डोंगरा वरील पाणी, मोसम, बोरी, पांझरा, भुराई नदीत आणून या सर्वं नद्या बारमाही करायच्या आहेत. नर्मदा नदीचं आपल्या वाट्याच पाणी अडवून तें धडगाव, अक्कलकुव्यात फिरवून शहाद्या पर्यंत आणायचं आहे. बोदवड, सुलवाडे, सारंगखेडा, प्रकाशा या बॅरेजचे पाणी लिप्ट करून शेतकऱ्यांना द्यायचे आहे. गाव शहरांना पिण्यासाठी पाणी द्यायचे आहे. हातनूर, गिराणा धरणं गाळानी भरली आहेत. तों गाळ उपसून काढावा लागेल. या साठी आपली एकजूट कायम ठेवा. गरज असेल तेंव्हा लढायची तयारी ठेवा.
डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवा. मंजूर झालेला पैसा हातात घ्या तरच सुधारित प्रशासकीय मान्यतेतून मिळालेल्या बजेटचा आनंद आहे. योजना मंजूर होतात, पैसा मंजूर होतो पण प्रत्येक्ष कामाच्या निविदा निघत नाहीत. पैसा मिळत नाही तों बलवान नेते पळवून दुसरीकडे खर्च करतात. तस जर झालं तर जिंकण्याचा आनंद क्षणभंगुर ठरेल आणि मग त्या कथेतील गाण्या सारखं होईल.
आंधीनी गड जिका वं माय!
चालीनं तवय खरं वं माय!
असं झालं नाही तरच आपल्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेचा आनंद घेता येईल.
रात्र वैऱ्याची आहे राजा सावध रहा !

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button