ताज्या घडामोडी

भूल गये हो बरबाद हो जाओगे

प्रासंगिक…..✍️

भूल गये हो बरबाद हो जाओगे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 16/12/2023 :
वाचक बंधू भगिनींनो
आज माझे मन शरम ,निराशा, हताशा व दुःख याने पूर्णपणे भरून गेले आहे.
आज सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्या, सर्व युट्युब वाहिन्या, सर्व सोशल मीडिया ,राजकीय पक्ष, राजकीय नेते, प्रिंट मीडिया ,आणि मेनस्ट्रीम मीडिया, वृत्तपत्रे मी आवर्जून पाहिली अनेक राजकीय नेत्यांचे भाषणे, निवेदने, टोमणे, खोके, ओके सर्व पाहिले पण सर्वांनाच बेशरमपणे आजच्या दिवसाची विस्मरण झाले आहे. त्यामुळे माझे मन वर नमूद केल्याप्रमाणे दुःखी झाले आहे.
मी सकाळपासून आत्ता सायंकाळपर्यंत मुद्दाम म्हणून वेळात वेळ काढून सर्व वर नमूद केल्याप्रमाणे सर्वकाही पडताळून पाहिले. पण आजच्या दिवसाचे कोणासही आठवण आली नाही.
🟣आज काय आहे?
आज 16 डिसेंबर भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण 16 डिसेंबर 71 ला डाक्क्यामध्ये जनरल नियाजीने जनरल अरोरा यांच्या पुढे शरणागती पत्करली. शरणागतीवर सह्या केल्या व 91 हजार युद्ध कैदी पहिल्या दुसऱ्या महायुद्धात झाली नव्हते इतके युद्ध कैदी पकडले गेले. इंदिराजींच्या नेतृत्वाखाली लाल, नंदा, माणिकशा नेतृत्वाने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्मिती केली. 47 च्या मानहानीचा काही प्रमाणात बदला घेतला.
पण हजारो सैनिकांचे बलिदान आपण सर्व भारतीय नागरिक नेते वृत्तपत्रे वृत्तवाहिन्या व्हाट्सअप ग्रुप फेसबुक युट्युब वाहिन्या प्रिंट मीडिया मेनस्ट्रीम मीडिया सर्वजण विसरून गेले आहोत.
सर्व राजकीय पक्ष राजकीय नेते व वृत्तवाहिन्या यावर एक सेकंदासाठीही या सोळा डिसेंबरच्या सुवर्ण क्षणाचा उल्लेख नाही. भारतीय सैन्य व त्यांचा भीम पराक्रम याची नोंद नाही.
🟡कृतघ्न पणाची परिसीमा
आठवण नाही, कृतज्ञता नाही, कोठेही या विजयाची आठवण नाही. असा हा समाज, राजकर्ते इतके कृतघ्न कसे झाले याचे मनास कोडे पडले आहे.
आपणही सर्वजण 16 डिसेंबर 71 विसरलो आहोत. आपल्या सैन्याचा पराक्रम, त्याग, बलिदान मातीमोल झाला काय? असा प्रश्न मनास पडत आहे.
“भूल गये तो बरबाद हो जाओगे याद रहे तो आबाद रहोगे”
भारतीय सैन्य दल, त्यांचा पराक्रम, त्यांचा त्याग, त्याचे बलिदान, इंदिराजींचे युद्ध नेतृत्व व कणखरपणा यास लाख लाख प्रणाम
मी विसरलो नाही तुम्हीही विसरू नका.

ॲड. अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी

(आपल्याही भावना माझ्यासारख्याच असल्या तर माझ्या नावाशिवाय अगर नावासह हा लघुलेख इतरांना पाठवा व सैन्याच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा धन्यवाद)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button