ताज्या घडामोडी

छमछम गर्ल सोबत डॉक्टरांची रेव्ह पार्टी

छमछम गर्ल सोबत डॉक्टरांची रेव्ह पार्टी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव दिनांक 14/12/2023 :
पाचगणी ते महाबळेश्वर दरम्यान असणार्‍या कासवंड गावच्या स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांनी बारबालांसमवेत ‘छम्छम्’ रेव्ह पार्टी (Rave Party) केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करून अश्लील व बिभत्स नृत्य करणार्‍या 4 बारबालांना ताब्यात घेत, सातारा जिल्ह्यातील 5 डॉक्टर्स, मिरजमधील 1 डॉक्टर व पुण्यातील 1 फार्मासिस्ट, हॉटेल मालक व वेटर अशा एकूण 9 जणांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
डॉ. रणजित तात्यासाहेब काळे (वय 43, रा. बाजार पटांगण दहिवडी, ता. माण), डॉ. नीलेश नारायण सन्मुख (वय 39, रा. लक्ष्मी मार्केट मिरज, ता. मिरज, जि. सांगली), डॉ. मनोज विलास सावंत (वय 40, रा. जयवंत नगर, दहिवडी ), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (वय 40, रा. मलकापूर, कराड), डॉ. राहुल बबन वाघमोडे (वय 31, रा. गोंदवले, ता. माण), डॉ. हनुमंत मधुकर खाडे (वय 65, रा. दहिवडी), फार्मासिस्ट प्रवीण शांताराम सैद (वय 40, रा. आलडीया, माळुंगे पाडळे, पुणे), हॉटेल व्यावसायिक विशाल सुरेश शिर्के (वय 36, रा. पसरणी ता. वाई), वेटर उपेंद्र ऊर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल (वय 31, रा. स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट), अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कासवंड येथे ‘द स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट’ हॉटेलच्या तळमजल्यावर रेव्ह पार्टीसारखा प्रकार सुरू असल्याची माहिती मंगळवारी रात्री पोलिसांना मिळाली. अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांना खबर्‍यामार्फत ही माहिती कळली. त्यानुसार त्यांनी सातार्‍याहून विशेष पथक पाठवून पोलिसांना सूचना केल्या. पोलिसांनी रात्री साडे नऊच्या सुमारास तत्काळ तिथे धाव घेतली. तेव्हा तेथील दरवाजा बंद आढळला. मात्र आत अश्लील व बिभत्स नृत्य करणार्‍या 4 बारबालांसह डॉक्टरांचा गलका सुरू होता.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button