ताज्या घडामोडी
श्रीमती रुक्मिणी दत्तू बोडके यांचे वार्धक्यांने निधन

श्रीमती रुक्मिणी दत्तू बोडके यांचे वार्धक्यांने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 11/06/2025 : बोडके वस्ती – बागेचीवाडी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील रहिवासी श्रीमती रुक्मिणी दत्तू बोडके (वय 105 वर्षे) यांचे सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास राहते घरी वार्धक्याने निधन झाले. त्यांचे पश्चात 6 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे, नातसुना, पतवंडे, असा मोठा परिवार आहे.
कै.श्रीमती रुक्मिणी दत्तू बोडके या धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 18/6/2025 रोजी सकाळी ठीक आठ वाजता अकलाई घाट अकलूज या ठिकाणी सुरू होईल.