अनाथांचा नाथ समर्थ फोटो स्टुडिओ

अनाथांचा नाथ समर्थ फोटो स्टुडिओ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 12/12/2023 :
येथील नव्या बाजार तळावरील समर्थ फोटो स्टुडिओ चे मालक शेखर श्रीपती गायकवाड व त्यांचे चिरंजीव चैतन्य गायकवाड हे भटक्या कुत्र्यां साठी देवदूत ठरलेले आहेत. या विभागातील सर्व भटक्या कुत्र्यांच्या भोजनाची व्यवस्था ते सकाळ संध्याकाळ करतात. तसेच जी मादी व्याली असेल तिला उन वारा थंडी पासून संरक्षण मिळावे म्हणून स्वतः चे दुकानाचा एक भाग उघडा ठेऊन त्यात अंथरूण करून ठेवतात व तिची पूर्ण देखभाल करतात.
त्यांच्या या मानवतेच्या भावनेचा शिरकाव पशू वैद्यकीय डॉ असलेल्या राजमाने यांच्यात ही प्रक्षेपित झाल्याने एक रुपयाचे ही शुल्क न आकारता ते भटक्या कुत्र्यावर मोफत उपचार करतात. कांहीं दानशूर लोक कुत्र्यां साठी तांदूळ , गहू , दूध , अंडी , बिस्कीट चे पुडे ही देऊ करतात.
एका अर्थाने ही परोपकारवादी व मानवतावादी भूमिका आसपासचे जनतेत व्यापाऱ्यात रुजलेली आज पहावयास मिळत आहे
स्वामी समर्थ ,आणि श्री दत्त भक्ती संप्रदायातील लोक या कामासाठी अत्यंत सढळ हाताने मदत करत असल्याचे शेखर श्रीपती गायकवाड यांनी प्रतिनिधी ऍड. अविनाश टी. काले अकलूज (9960178213) यांच्याशी बोलताना सांगितले.