⚧ ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

⚧ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
💫li.माहिती.सेवा.ग्रूप.il
अकलूज दिनांक 09/12/2023 :
चंद्रयान-3 च्या यशानंतर ISRO ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-एल1 लॉन्च केले होते. आता याच आदित्य-एल1 एक मोठी कामगिरी केली आहे. या यानावर असलेल्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने (Solar Ultraviolet Imaging Telescope- SUIT) पहिल्यांदाच सूर्याचा फूल डिस्क फोटो कॅफ्चर केला आहे. हे सर्व फोटो 200 ते 400 नॅनोमीटर तरंगलांबीचे आहेत. यामुळेच या फोटोंमध्ये सूर्य 11 वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसत आहे.
आदित्य-L1 चा SUIT पेलोड 20 नोव्हेंबर 2023 रोजी ॲक्टिव्ह झाला. आता या दुर्बिणीने सूर्यप्रकाशातील फोटोस्फियर (Photosphere) आणि क्रोमोस्फिअरचे (Chromosphere) फोटो घेतले आहेत. फोटोस्फियर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फियर म्हणजे, सूर्याचा पृष्ठभाग आणि बाह्य वातावरणातील पातळ थर. क्रोमोस्फियरचा विस्तार सूर्याच्या पृष्ठभागापासून 2000 किलोमीटरपर्यंत आहे.
यापूर्वी सूर्याचा फोटो 6 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आला होता. पण, तो पहिला लाईट सायन्स फोटो होता. आता यानाने सूर्याचे फुल डिस्क इमेज घेतले आहेत. म्हणजेच सूर्याच्या त्या भागाचा फोटो, जो पूर्णपणे समोर आहे. या फोटोंमध्ये सूर्यावरील डाग, प्लेग आणि सूर्याचा शांत असलेला भाग स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोंच्या मदतीने शास्त्रज्ञ सूर्याचा योग्य अभ्यास करू शकणार आहेत.
🔹या संस्थांनी मिळून तयार केले SUIT पेलोड
पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA), मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE), सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडिया (CESSI), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर वेधशाळा, तेजपूर विद्यापीठ आणि ISRO शास्त्रज्ञांनी मिळून SUIT तयार केले आहे.