ताज्या घडामोडी

जय मल्हार बोलो नागपूर चलो!

जय मल्हार बोलो नागपूर चलो!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 08/12/2023 :
सध्या आरक्षण विषय राज्यात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मराठा समाजाला obc वर्गातून आरक्षण हवं आहे. त्याला घटना मान्यता देत नाही. तर आम्ही obc तूनच आरक्षण घेऊ असा मराठा नेत्यांचा हट्ट आहे. तिकडे obc ही लढाईच्या पवित्र्यात उभा आहे. काही झालं तरी मराठा समाजाला आमच्या ताटातील देणार नाही ही जिद्द obc समाज घेऊन उभा आहे. मराठ्यानां आरक्षण द्या पण आमचं काढून देऊ नका. दुसरी कडे धनगर समाज 70 वर्ष st प्रवर्गातून आरक्षण मागत आहे. कारण धनगर हे प्रस्थापित आदिम जमाती पेक्षाही मागासलेले आहेत, तसेच त्यांना घटनेत आरक्षण आहेच. फक्त धनगर चे धनगड झाले आहे. सरकारी कागदोपत्रात ईतर काही ठिकाणी हां शब्द धनगर तर काही ठिकाणी धनगड असा लिहिला आहे. म्हणून धनगर गेली सत्तर वर्ष आंदोलन करत आहेत तर धनगर जमातीला st प्रवर्गात घेऊ नये असा हट्ट प्रस्थापित st वर्ग जाती करत आहेत. त्यासाठी तेही मोर्चे काढत आहेत.
या सर्वं जागी सरकारची तारेवरची कसरत सुरु आहे. त्यांची दमछाकं झाली आहे. सरकारचे मंत्री सर्वांनां हो म्हणत आहेत. सरकार मराठ्यानां म्हणत आम्ही तुम्हाला कुणबी प्रमाण पत्र देऊ. तशी प्रक्रियाही सुरु केली आहे. इकडे obc नां तेच सरकार म्हणत आम्ही obc च्या वाट्याचं ईतर कोणाला देणार नाही. मराठे म्हणतात, मराठा जाती वर्गाला स्वतंत्र आरक्षण दिलं तर कोर्टात टीकत नाही. म्हणून आम्हाला obc तूनच आरक्षण द्या. तें काम सरकार करत आहे. त्यांनी मागस वर्ग आयोगावर तसा दबाव टाकत मराठा वर्गाला मागास वर्ग घोषित करा म्हणून सांगत आहे. त्याला मागस वर्ग आयोग मान्य करत नाही. त्यातील सदस्य राजीनामे देत आहेत. आता पर्यंत 4 सदस्यानी राजिनामे दिले आहेत.
धनगरही जोरात आंदोलन करत आहेत. पण हे आंदोलन विस्कळीत आहे. पुन्हा तीच परिस्थिती, धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा! एक नेता निवडा तरच यशस्वी व्हाल.
सध्या सर्वं बाजूनी विचार केला तर आ गोपीचंद पडळकर हे नेतृत्व सर्वांनी स्वीकारावं असं मला वाटते. त्यांनी आता हिंदुस्थान शिव मल्हार नावाची संघटनाही उभी केली आहे. तिच्या माध्यमातून 11 डिसेंबर 2023 ला नागपूर विधानसभा अधिवेशना वर धनगर आरक्षणासाठी मोर्चा काढायचे ठरले आहे. या मोर्च्यात लाखोच्या संख्येने सामील होऊन सरकार वर दबाव आणावा म्हणजे आरक्षणाचा मार्ग सुलभ होईल.
गोपीचंद पडकर एक झुंजार व्यक्तीमत्व आहे. त्यांनी सरकार पक्षालाच धनगर आरक्षणासाठी आव्हानं दिले आहे. तरी समाज बांधवानी पण, किंतु, परंतु अशी कोणतीही शंका उपस्थित नं कर्ता मोर्च्यात सामील व्हा.
या एका मोर्च्याने तुम्हाला लगेच आरक्षण मिळेल असं माणण्या इतपत भोळसट मी नाही. हां मोर्चा फक्त एक झाकी असेल. पुरी पिक्चर बाकी आहे. तुम्हा एक झेंडा, एक संघटना, एक नेता उभा करावा लागेल. त्या मार्फत दीर्घ आणि तीव्र लढे उभारावे लागतील. आंदोलनातील सातत्य कायम ठेवावे लागेल. तरच आणि तरच तुम्हाला आरक्षण मिळेल. अन्यथा नाही. कधी यश मिळेल कधी अपयश मिळेल. तरी आपल्याला लढत रहावे लागेल. तस केलं तर विजय नक्की मिळेल. बस आता एवढेच. पुढे प्रत्येक वेळी योग्य चर्चा करत राहू.
हवामे ताश का महेल नही बनता,
रोनेसे मुकद्दर नही सुधरता!
जितनेका होसला रख्खो,
एक हारसे कोई फकीर और,
एक जीत से कोई सिकंदर नही बनता!

रुखी सुखी खायेंगे!
आरक्षण लें आएंगे!

हर जोर जल्मकीं टक्कर मे,
संघर्ष हमारा नारा हैं!

जय मल्हार बोलो नागपूर चलो!

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button