ताज्या घडामोडी

खांदेशातील कायदा आणि सुव्यवथा वाईट आहे

खांदेशातील कायदा आणि
सुव्यवथा वाईट आहे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 27/11/2023 : साक्री हे धुळे जिल्ह्यातील तालुक्याच ठिकाण आहे. तिथं तालुका पोलीस मुख्यालय आहे. गाव विशेष मोठं नाही. तरी रात्री दोन वाजता सरस्वती नगर मधील निलेश पाटील यांच्या दौलत बंगल्यावर रात्री दरोडा पडला. त्यात दरोडेखोरांनी काही ऐवज आणि निलेश पाटील यांची 22 वर्षीय तरुण भाची हिचे आपहरण केले. ही तरुणी मोठा भाऊ शेवाळे यांची कन्या आहे. मोठाभाऊ शेवाळे हे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. ही बाब विशेष आहे.
साक्री गावात पडलेला हा दरोडा अत्यंत पाशवी आणि भारतातील कदाचित एकमेव दरोडा असावा. दरोडेखोर पैसा अडका, सोनं नाण लुटून नेतात हे घडत असत. कधी कधी स्त्रियांचीं विटंबनाही करतात. पण अशा प्रकारे तरुण मुलींना पळवून नेणं असं अलीकडे कुठे ऐकिवात नाही. हे अत्यंत क्लेश दायक आहे.
गेले दोन दिवस या बाबतचीं पोस्ट व्हाटसअप वर फिरत आहे आणि त्या मुलीचे कुटुंबीय मदतीसाठी जनतेला गया वया करत मदतीसाठी याचना करत आहेत. मग राज्याच गृहखात काय करत आहे? सरकार काय करत आहे? जो झाला तो प्रकार भयंकर आहे. खान्देशांत, जान, माल आणि अब्रू सुरक्षित नाही हे यातून उघड होत आहे. यातून अत्यंत खेद जनक गोष्ट म्हणजे या अत्यंत भयावह प्रकाराची मराठी मीडियावर कुठेच वाच्यता नाही. का? ही पोरगी खान्देशी आहे म्हणून? खान्देशी लोकांना जीव अब्रू काहीच नसतं का?
आपहरण झालेल्या मुलीचे वडील भारतीय पोलीस संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. तरी त्यांच्या वर ही अवस्था. मग इतरांच काय? शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी हे कृत्य केले आहे. पैसा गेला तर जाऊ द्या पण पोरीचा जीव आणि आब्रू धोक्यात आहे. पोलिसांनी ताबडतोब गुन्ह्याचा छडा लावावा. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्ती पथक गस्त घालत असतात. साक्री सारख्या छोट्याशा गावात हे अमानुष कृत्य घडत. त्याचा सुगावा पोलिसांच्या गस्ती पथकाला लागू नये हे नवल आहे. राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री आहेत. ते काय करतात? त्यांच्या पर्यंत ही बातमी पोलिसांनी पोहचविली की नाही. पोहचविली असेल तर मग तें तिघे गप्प का? या गुन्ह्याचा शोध त्वरित लावावा. हा गुन्हा शोधून काढणे तेवढा अवघड प्रकार नाही. एक जिवंत मुलगी त्यांनी पळवून नेली, तीला लपवून ठेवता येणार नाही. त्याचा सुगावा लागयला वेळ लागणार नाही.
ज्या घरावर दरोडा पडला त्या घरात त्या दिवशी पुरुष नाही ही खबर दरोडेखोरा पर्यंत पोहचली होती. याचा अर्थ त्यांचा खबऱ्या गावातीलच असू शकतो. निलेश पाटील बाहेर गावी गेले ही खबर खबऱ्यानें दरोडेखोरा पर्यंत पोहचविली असावी. पोलिसांनी थोडीसी अक्कल हुशारी वापरली तर या घटनेचे धागे दोरे गावातच सापडतील. तें हिंदी वगैरे बोलत होते हे ओळख लपविण्याचा आणि दिशाभूल करण्याच सोंग होत. तें जवळ पासचेच असू शकतात. किंवा शेजाराच्या गुजराथ राज्यतिलही असू शकतील. त्यांचा तपास लवकर लावा.
सर्वं इलेट्रिक मीडियाचे प्रतिनिधी गावा गावात नेमले आहेत. तसें खान्देशांतही आहेत त्यांना ही बातमी कळली नाही का? अरे ब्रेकिंग न्यूज आहे ही. काय करतात हे खान्देशी वार्ताहर? हिंदी मराठी सर्वं टीव्ही चॅनेलवर बातमी प्रसारीत झाली तर, नागरिकही मदत करतील आणि पोलिसांचं काम सोपं होईल.
मी हां लेख लिहुन पूर्ण करे पर्यंत बातमी आली कीं, सदर तरुणी सेंधवा इथून हस्तगत करून शिरपूर येथील पोलीस ठाण्यात आणली आहे. या सर्वं बहाद्दूर शिपायी गड्यांच अभिनंदन. आता या गुन्हेगारांचा पूर्ण तपास करून त्यांना कठोरातील कठोर शासन करावे. जेणे करून कोणी हरामखोर अशा परक्याच्या आई बहिणीवर वाकडी नजर ठेवणार नाही. पुन्हा एकदा पोलीस खात्याला धन्यवाद!

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button