सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फ्रेशर्स पार्टी जल्लोष

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फ्रेशर्स पार्टी जल्लोष
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 16/9/2023 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर -अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि.१६/०९/२०२३ रोजी प्रथम वर्ष पदवी व पदविका मधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक, सचिव, शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, निर्णय क्षमता असेल तरच विकास होऊ शकतो. तसेच ज्ञान वाढवा, रोज अभ्यास करा, आवडीने शिका असाही संदेश त्यांनी दिला. आई वडिलांना आत्मविश्वास यायला पाहिजे अशा पद्धतीने वागल पाहिजे, मोबाईलचा अतिवापर टाळा असेही सांगीतले. 2030 पर्यंत सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये 25 लाख जॉब निर्मिती होणार आहे असेही त्यावेळी नमूद केले.
कार्यक्रमास सर्व विभागाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. चि. शिवतेज माने देशमुख (प्रथम वर्ष संगणक पदविका) या विध्यार्थ्याने आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर मुलांनी रिवर बँक, म्युझिकल चेअर, वाकर बॉटल, पासिंग पिलो, इन फाइनाईट लूप, टंग ट्विस्टर, बर्स्ट -बलून, पोझिशन चॅलेंज, सिंगिंग अँड डान्सिंग इत्यादी फनी गेम्स चा आनंद लुटला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.संजय झंजे व प्रा.सुजाता रिसवडकर यांनी काम पाहिले.