सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये टेक्निकल इव्हेंट संपन्न:

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये टेक्निकल इव्हेंट संपन्न:
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/03/2024 :
येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर – अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये टेकमहर्षी हा टेक्निकल इव्हेंट दि. १९/०३/२०२४ रोजी महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदर इव्हेंटमध्ये सोलापूर जिल्ह्यामधील विविध डिप्लोमा इंजीनियरिंग महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यामध्ये एकूण ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी पॉलिटेक्निक, सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित देशमुख हे उपस्थित होते.
टेकमहर्षी या टेक्निकल इव्हेंट मध्ये क्विज, पोस्टर प्रेसेंटेशन, प्रोजेक्ट आयडिया प्रेझेंटेशन,ब्रिज मॉडेलिंग, सर्किट सुडोकू, कॅडवार असे टेक्निकल इव्हेंट घेण्यात आले होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे,
टेक्निकल क्विज स्पर्धेमध्ये व्ही.पी.पॉलिटेक्निक इंदापूरची विद्यार्थिनी स्नेहा पवार विजेती तर सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य बचुटे उपविजेता ठरला, पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये श्रीराम पॉलीटेक्निक पाणिव ची विद्यार्थिनी प्रतीक्षा काळे विजेती तर श्वेता बंडगर उपविजेती ठरली, ब्रिज मॉडेलिंग स्पर्धेमध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी जयराज भिंगारदिवे व आयुष्य पताळे विजेता तर विद्यार्थिनी ऋतुजा डांगे व रीया कांबळे उपविजेती ठरले, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित सोनार व गणेश दुधाळ विजेता तर आदर्श पोतदार व विद्यार्थिनी अंकिता माने उपविजेता ठरले, ब्लाइंड सी या स्पर्धेमध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांजली माने देशमुख विजेती तर व्ही.पी.पॉलिटेक्निक इंदापूर कॉलेजची विद्यार्थिनी स्नेहा पवार उपविजेती ठरली, सर्किट सुडोकू स्पर्धेमध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य सालगुडे पाटील विजेता तर शिवाजी पॉलीटेक्निक सांगोला महाविद्यालयाची विद्यार्थिनी पल्लवी लिगडे व तनुश्री खटकळे उपविजेती ठरल्या आणि कॅडवार या स्पर्धेमध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी दर्शन मोरे विजेता तर शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश चौधरी उपविजेता ठरला.
यावेळी शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी महाविद्यालयाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे सचिव राजेंद्र केरबा चौगुले या सर्वांच्या व महाविद्यालयाच्या वतीने विजेता, उपविजेता तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक शब्बीर शेख, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल निकम यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. श्रीकांत कासे यांनी तर आभारप्रदर्शन कु. मीनाक्षी राऊत यांनी केले.