ताज्या घडामोडी

“हरखचंद सावला” – कँन्सरग्रस्त रुग्ण व नातेवाईकांचा आधारवड

“हरखचंद सावला”कँन्सरग्रस्त रुग्ण व नातेवाईकांचा आधारवड

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 20/03/2024 :
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय अस म्हणतात…
24 वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणि शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धावा केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला “देवत्व” बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.पण 27 वर्षात दहा बारा लाख कँन्सरग्रस्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्‍या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहीत. विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला..
मित्रांनो माणुस देव शोधतो पण कुठे?
कोणी मंदीरात तर कोणी मस्जिद मध्ये. पण गेल्या 27वर्षात कँन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांना देव सापडला तो हरखचंद सावला यांच्या रुपात.
मुंबईच्या परळ भागातील प्रसिध्द टाटा कँन्सर हाँस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहुन तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दिकडे टक लावुन पाहत राहायचा.
मृत्युच्या दारात उभ राहील्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्‍यावरील दिसणारी ती भीती, त्यांच्या नातेवाइकांची भकास चेहऱ्‍याने होणारी ती धावपळ पाहुन तो तरुण खुप अस्वस्थ व्हायचा.
बहुसंख्य रुग्ण बाहेर गावाहुन आलेले गरीब लोक असायचे. कुठे कोणाला भेटायचे,काय करायचे हेही त्यांना ठाउक नसायचे. औषध पाण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाहि पैसे नसायचे.ते सार दृष्य पाहुन तो तरुण खिन्न मनाने घरी परतायचा..
आणि शेवटी याच तरुणाने एक मायेचे पाउल उचलले..
त्याचे एक चांगल हाँटेल भाड्याने देउन त्याच पैशातुन त्याने त्या हाँस्पिटलसमोर कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर एक यज्ञ सुरु केला जो पूढे 27वर्षे चालुच राहिला.
तेथील जनतेला सुध्दा हा ऊपक्रम आवडला आणि त्यांनीही हातभार लावला.
ते एवढेही करुन थांबले नाही त्यांनी रुग्णांना मोफत औषध पुरवायलाही सुरवात केली.त्यासाठी त्यांनी औषधांची बँकच उघडली. त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डाँक्टर अन वर्करची टिमच त्यांनी स्थापन केली.
आज त्यांनी स्थापन केलेला जीवन ज्योत ट्रस्ट साठ हून अधिक उपक्रम राबवत आहे.अशा या सत्तावन्न वर्षिय हरखचंद सावला यांच्या कार्याला माझा शतशः प्रणाम।

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button