ताज्या घडामोडी

दोन खान्देशी भाऊंच, जोडे मारो आव्हान!

दोन खान्देशी भाऊंच,
जोडे मारो आव्हान!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharastra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 26/11/2023 :
खान्देशी दोन भाऊ नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ. दोघांचे मतदार संघ आणि निवास बांदाला बांद. मुक्ताईनगरला लागून जामनेर. दोघेही एकाचं भाजपच्या नाण्याच्या दोन बाजू. दोघेही सुरवातीला सख्खे शेजारी, नंतर पक्के वैरी. एकाच पक्षात असताना दोघात काही काळ सुप्त संघर्ष. नाथाभाऊंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि या छुप्या संघर्षाचे स्वरूप उघड वैरात झालं. हां संघर्ष विकोपाला गेला आणि त्याने वैराच शिखर गाठल. शिखरावरचे हे दोन्ही कुस्तीगीर तोल सुटून खाली दरीत कोसळले आणि त्यांच्या संघर्षाने अत्यंत खालची पातळी गाठली. हे दोन्ही भाऊंनी केलं.
त्याचं असं झालं कीं, नाथाभाऊंना हृदय विकाराचा सौम्य झटका आला. म्हणून त्यांना पुण्याच्या नामांकित इस्पितळात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार झाले. त्यांना आराम मिळाला, प्रकृती सुधारली नाथाभाऊ मुक्ताईनगराला रवाना झाले.त्यांच्या आजराच निमित्त साधून गिरीशभाऊंनी नाथाभाऊवार शरसंधन केलं. म्हणाले, नाथाभाऊंचा आजार खोटा होता. जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी नाथाभाऊंनी हा खेळ केला.
खरं तर आजारावर शरीररिक व्यंगावर विनोद वा टीका करू नये असा सभ्य संकेत आहे. पण गिरीश भाऊंना भान राहिले नाही आणि त्यांनी नाथाभाऊच्या आजारावर ही टीका केली. गिरीशभाऊंच भान सुटल्यावर बेभान झालेल्या नाथाभाऊंनी जशास तसें उत्तर द्यायचे ठरविले. म्हणजे इटका जबाब पत्थर!
नाथाभाऊ म्हणाले, “मी खरंच आजारी होतो. माझ्याकडे दावाखान्याचे सर्वं पेपर आहेत. गिरीश महाजनानी तें तपासून पाहावे. मी जर खोटं बोलत असेल तर महाजनानी मला जोड्याने मारावे. पण माझं खरं असेल तर मग मात्र मी गिरीश महाजनला जोड्याने मारीन. केवढी प्रतिष्ठा? केवढी स्पर्धा? केवढी ही चढाओढ? एकाने गाय कापली म्हणून दुसरा वासरू कापायला तयार. याला म्हणतात जिद!
अशी प्रतिष्ठा, असा प्रिष्टीष इशू करायला पाहिजे होता, हातनूर धरणातील गाळ काढण्यासाठी, पाडळसरे धरण पूर्ण कारण्यासाठी, नार गिराणा लिंक जोडण्यासाठी. तापी-नर्बदेचं पाणी आडवीण्यासाठी. यासाठी अट्टाहास केला असता, यासाठी प्रीष्टीष इशू केला असता तर खांदेशात घराघरात नळ पोहचले असतें. शेताशेतात सिंचन झाले असतें. खान्देशी माणसाच स्थलांतर रुकल असत. खान्देशी लोकांनी तुमचे फोटो घराघरात लावले असतें.
पण तस घडत नाही. फक्त हे दोन खान्देशी भाऊच नाही सर्वच खान्देशी नेते एका माळेचे मणी आहेत. यांना प्रादेशिक अस्मितेपेक्षा वैयक्तिक यऊनिधूनी महत्वाची असतात. यांच्या भांडणाचे विषय धरण नाहीत, लोहमार्ग नाहीत, औद्योगिकरण नाही, रोजगार निर्मिती नाही तर यांची वैयक्तिक अस्मिता आहे. पोरकट भांडण, आरेला कारे, शाळकरी मुलासारखी भांडतात ही नेते मंडळी! दोघांची उंची मोजली तर दोघेही राज्याच्या राजकरणातील कॅबिनेट दर्जाची माणसं पण भांडण गल्लीतली! हे या भांडणात हे ही विसरतात कीं, आपल्या डोक्यावर सरकारी लाल दिवा आहे. त्यांच्या डोक्यावरील लाल दिवा म्हणजे यांना गल्लीतील मिरवाणुकीतील डोक्यावरची गॅस बत्ती वाटते.
म्हणे काम नही कांय करू लुगडं फाडी दांडी करू. वं माय असा दाँडी कराना रिकामा कामे करू नको नां बायजा. वावरमां जाय, निंदा टुपाना कामे कर, जुवार बाजरीनी लानी कर, पय येच, मोगरी वरी कणसे कुटना लाव, भुईमूग उपाड, उडीद मुंग चविन्या शेंगा तोड, तीहीन्या कोथ्या झेल. तोरन्या शेंगा ठोक, कथी लुगडा फाडी दांड्या करत बठस उठ. निदान उठ पय गहू दय करशील तरी पोरेसले दोन बलाका खावाले भेटथीन वं मनी मोठं माय!

एकनें कही दुजेनें सुनी!
कबीर कहे दोनो ब्रह्मज्ञानी!

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button