“ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रताप क्रीडा मंडळ कार्यरत”: स्वरूपाराणी मोहिते पाटील.

“ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रताप क्रीडा मंडळ कार्यरत”: स्वरूपाराणी मोहिते पाटील.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज (प्रतिनिधी) दिनांक 26/11/2023 : “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी प्रताप क्रीडा मंडळ कार्यरत आहे .विद्यार्थी, कलावंतांनी स्वतःला कमी लेखू नये. आत्मविश्वासपूर्वक आपली कला सादर करावी” असे आवाहन प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी केले.
प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने अकलूज व सदाशिवनगर येथे शालेय विद्यार्थी कलाकारांना नृत्य, अभिनय, पदन्यासाची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. स्मृतीभवन शंकरनगर येथे १०५९ कलाकार सहभागी झाले. त्यांना शास्त्रीय नृत्य दिग्दर्शक अजय शेंडगे यांनी प्रशिक्षण दिले. तर शिवामृत भवन सदाशिवनगर येथे ५८२ कलाकार सहभागी झाले. त्यांना सोनम वोरा नारायणकर,प्रताप थोरात यांनी प्रशिक्षण दिले. एकुण १६४१ कलाकारांनी याचा लाभ घेतला.
स्मृतीभवन येथे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थी कलावंतांना प्रोत्साहन दिले.
व त्यांचा उत्साह वाढवला.
या वेळी उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, संचालक वसंतराव जाधव, डॉ. विश्वनाथ आवड, स्पर्धाप्रमुख मुख्याध्यापक संजय गळीतकर, अमोल फुले, पोपटराव देठे, सचिव बिभिशन जाधव, सर्व संचालक, शिक्षक प्रमुख उपस्थित होते.
प्रस्ताविकात स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर म्हणाले,
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने दि. २३ ते २५ डिसेंबर२०२३ रोजी राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले. या मध्ये सहभागी कलावंतांना नृत्य,अभिनय,पदन्यासाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे याकरिता मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यशाळा आयोजीत केली आहे.
उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील म्हणाले, प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील व अध्यक्षा कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील ४२ वर्षापासून मंडळाच्या राज्यस्तरीय समुहनृत्य स्पर्धा सुरू आहेत. लावणी, कुस्ती, लेझीम याबरोबरच समुहनृत्य स्पर्धेसाठी ही अकलूज ची ओळख आहे. पुढील वर्षी कलावंतासाठी ७ ते १० दिवसाची निवासी कार्यशाळा आयोजित करणार आहोत. सूत्रसंचालन पोपट पवार, इलाई बागवान, विजय निंबाळकर, ज्ञानेश्वर माने देशमुख यांनी केले.