⭕बिबट्याचा हल्लात मुलगी ठार 🟡वन्यप्राण्यांचा(बिबट्याचा) बंदोबस्त करा मगच मृतदेह हलवा ग्रामस्थांनी धरले वनाधिकाऱ्यांना धारेवर

⭕बिबट्याचा हल्लात मुलगी ठार
🟡वन्यप्राण्यांचा(बिबट्याचा) बंदोबस्त करा मगच मृतदेह हलवा ग्रामस्थांनी धरले वनाधिकाऱ्यांना धारेवर
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude
Akluj Taluka Malshiras District Solapur Maharastra State, India.
Mo.9860959764.
शित्तुर वारुण दिनांक 20/11/2 — शित्तुर वारुण पैकी तळीचावाडा येथील सारिका बबन गावडे हिचा आज बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि सारिका गावडे आपल्या चुलतीसोबत घराशेजारीच शेळी चारण्यासाठी गेली होती चुलती पुढे मध्ये शेळ्या पाठीमागे सारिका असे जात असताना घरापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारीका वर हल्ला केला. तिच्या मानेवर ,डोक्यावर खोलवर जखमा केल्या. चुलतीने आरडाओरडा केल्यावर बिबट्या पळून गेला परंतू जागेवर तिचा दुर्दैवी मृत्यु झाला.असून सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वनविभाग मलकापूर येथे झाली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या या डोंगरालागत असणाऱ्या उदगिरी, राघूवाडा, ढवळेवाडी, तळीचावाडा विठ्ठलाईवाडी, केदारलिंगवाडी, शित्तुर वारुण, उखळू या भागात गेल्या काही महिन्यातपासून बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आतापर्यंत केदारलिंगवाडी येथील शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू,उखळू येथील शाळाकरी मुलावर हल्ला, कदमवाडी येथे एकावर प्राणघातक हल्ला,20 पेक्षा जास्त गायी म्हैसी, 50 शेळ्या तितकेच कुत्री बिबट्याने ठार केली आहेत .
वनविभागाने याकडे गंभीरपणे लक्ष देणेची गरज आहे.वनविभागाच्या बाबतीत ग्रामस्थ कमालीचा रोष व्यक्त करत आहेत. बिबटया व अन्य प्राण्यांचा उपद्रवाने लोक हैराण झाले आहेत. वन्यप्राण्यांचा(बिबट्याचा) बंदोबस्त करा मगच मृतदेह हलवा असे म्हणत ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. वनविभागाने बंदोबस्त करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतरच मृतदेह हलविण्यात आला.
वनविभागाचे अधिकारी भोसले, वाडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
यशवंत क्रांती संघटनेचे शाहुवाडी तालुका संपर्क प्रमुख दिपक गावडेसह तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, शित्तुर गावचे ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील,माजी सरपंच तानाजी भोसले यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदत केली. शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख एम एम गुरव यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
“कोल्हापूर जिल्हात वन्यप्राण्यांचे हल्ले व वनखात्याच्या जाचक अटी मुळे जंगलात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांचे जगणंच मुश्किल झाले आहे.आजरा तालुक्यात हत्तीच्या हल्लात वनमजुर काही दिवसांपूर्वीच ठार झाला आहे.तर चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे.. पाळीव प्राण्याच्यावर हल्ले तर वन्यप्राण्यांचे रोजच सुरू आहेत.शाहुवाडी तालुक्यातील पुसार्ले धनगर वाड्यावरील लहान मुलीस वर्षभरापुर्वी ठार मारले आहे.खर तर वनात राहणाऱ्या वननिवासी धनगर बांधवांचे संसार संपूर्ण जंगलावर चाललेले असतात वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करणे तसेच जंगलातीलच वन जमिनीवर ते पारंपारिक शेतीही करत आलेले आहेत जंगलातील रानमेवा पारंपारिक व्यवसाय हा शेळ्या मेंढ्या जनावरे हि सुद्धा जंगलातील चाऱ्यावरतीच अवलंबून असतात. माणसाला जगण्यासाठी अग्नीची नित्तात गरज आहे.अग्नी पेटविण्यासाठी लाकुड,राँकेल,गँस यांची नितांत गरज आहे.वननिवासी जंगलात डोंगरदऱ्यात रहात असल्याने त्यांच्या पर्यंत जाण्यायेण्यासाठी आवश्यक असे रस्ते नसल्याने यांच्यापर्यत गँस पोहचने अवघड आहे. राँकेल शासनाने पुर्णपणे बंद केले आता वनाधिकारी यांनी नोटीस बजावून पारंपरिक पद्धतीने लाकूड गोळा करण्यावरही बंधने घातली अगोदरच चराईबंदी,वनहद्द निश्चित व वन बंदी,कुराडबंदी यासारख्या कायद्याने त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे,त्यांच्यापर्यत जाण्यायेण्याचा रस्ता करण्यासाठीही वनखात्याच्या किचकट अटी असलेल्या मुळे रस्ते करण्यासाठी दिलेले प्रस्ताव व वनकर्मचारी यांची अरेरावी यामुळे वनकार्यालयात धूळ खात पडून आहेत.केवळ रस्ता नसल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने प्रसुतीसाठी, ,दवाखान्यात झोळीत घालून नेत असताना व सर्पदंशाने,अनेकांचे मृत्यू ही झाले आहेत कोल्हापूर उपवनसंरक्षकांनी वन हक्काने मिळालेल्या जमिनीवर शेती किंवा वन्यप्राण्यांने हल्ला किंवा नुकसान भरपाई देण्यात येऊ नये म्हणून आदेश काढून वननिवासींचे जगणे आणखी मुश्किल केलेले आहे. शासनाने लक्ष घालून नुकसान ग्रस्त शेतकरी किंवा सारिका गावडे यांच्या वारसांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा : संजय वाघमोडे
संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य