⭕इरिगेशन कॉलनी च्या घाण पाण्याचा रस्त्यावर चिखल राडा 🔵 दुर्गंधीयुक्त पाण्याने रस्त्याचे डबक्यात रूपांतर 🟣 आजूबाजूस साठलेल्या पाण्यावर डासांची वस्ती

⭕इरिगेशन कॉलनी च्या घाण पाण्याचा रस्त्यावर चिखल राडा
🔵 दुर्गंधीयुक्त पाण्याने रस्त्याचे डबक्यात रूपांतर
🟣 आजूबाजूस साठलेल्या पाण्यावर डासांची वस्ती
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 19/11/2023 : म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात. परंतु इतरांना त्याचा त्रास होतो याचे म्हशीला जसे काही घेणे देणे नसते. असाच प्रकार अकलूज मधील इरिगेशन मधून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त घाण सांडपाण्याचा त्रास नाहक नागरिकांना सोसावा लागत आहे.
अकलूज तलाठी कार्यालया समोरून महावीर स्तंभाकडे जाणाऱ्या इरिगेशन कॉलनी च्या पाठीमागील बाजूच्या रहदारीच्या रस्त्यावर इरिगेशन कॉलनीतील व कार्यालयाच्या बाजूतील पाठीमागील रस्त्यावरून दूषित दुर्गंधीयुक्त घाण पाणी, सांडपाणी वर्दळीच्या रस्त्यावर साठले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यामध्ये या घाण पाण्या ची मोठ मोठी डबकी तयार झाली आहेत.
डबकी भरून होताच वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेजारील रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात साठून राहात आहे. या साठलेल्या पाण्यावर डासांची निर्मिती होऊन लोकवस्तीमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साठवून रहात असल्यामुळे पायी चालत जाणाऱ्यांना तसेच वाहनधारकांना या रस्त्यावरून जाता येताना मोठ्या प्रमाणात त्रासदायक कसरत करावी लागत आहे. येथे पाय घसरून, वाहन घसरुन सतत अपघात घडल्याचे दिसून येत आहे. सदरच्या घाण पाण्यामुळे लगत असणाऱ्या लोकवस्तीमध्ये डासांचे प्रमाण वाढल्याने लोक वस्तीतील नागरिकांना रहिवाशांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरपरिषद अकलूज व संबंधित इरीकेशन विभागाने तातडीने उपाययोजना करावी व नागरिकांना होणाऱ्या त्रासातून त्यांची मुक्तता करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.