सहकार महर्षि कारखान्याच्या १ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न

सहकार महर्षि कारखान्याच्या १ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न
Akluj Vaibhav News Network,
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 18/11/2023 : सोलापूर जिल्ह्यातील शंकरनगर- अकलूज येथील
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२०२४ च्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या १ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते आज संपन्न झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व
चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखान्याचा सिझन २०२३-२०२४ चा ऊस गळीत हंगाम दिनांक ०१/११/२०२३ रोजी सुरु झाला असून दि.१७/११/२०२३ अखेर १ लाख ३७ हजार ३४७ मे.टन ऊसाचे गाळप होऊन १ लाख ०९ हजार २५० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. बी-हेवी सोडून सरासरी साखर उतारा ८.२४% व आजचा साखर उतारा ८.४८ % आहे. सध्या प्रति दिवस ८,५०० मे.टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे.
चालू सिझन २०२३ २०२४ मध्ये को-जन बीज निर्मिती प्रकल्प दिनांक २८/१०/२०२३ रोजी सुरु झाला असून दि. १७/११/२०२३ अखेर त्यामध्ये वीज १ कोटी ०५ लाख ७० हजार ६०० युनीट निर्माण झाली असून त्यामधुन वीज विक्री ६२ लाख ०७ हजार ५३० युनिट केलेली आहे.
तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि. १७/११/२०२३ अखेर बी-हेवी पासून २१ लाख ५३ हजार ८०८ लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच १६ लाख ५३ हजार ४८६ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
साखर पोती पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडिया लेजर शो कमिटी संचालक – पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, सौ.हर्षाली निंबाळकर, तसेच माजी संचालक सुरेश पाटील, महादेवराव घाडगे, धनंजय चव्हाण, विजय माने-देशमुख, दत्तात्रय शिर्के, रामचंद्र चव्हाण, सुनिल एकतपुरे, मोहन लोंढे, केशव ताटे, नितीन निबाळकर संचालिका श्रीमती कमल जोरवर, मयुरी लोडे, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सदर साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याचे चेअरमनसाहेब जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे स्वागत चीप केमिस्ट एस.एन. जाधव व सत्कार चीफ इंजिनिअर एस. के. गोडसे यांनी केला.
(फोटो :- अतुल बोबडे मोबा. 9975752200)