ताज्या घडामोडी

भक्तांच्या पेटीत नेत्यांचा हात कशासाठी ?

भक्तांच्या पेटीत नेत्यांचा हात कशासाठी?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India .
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 13/11/2023 :
राजकीय नेते आणि त्यांचे सगेसोयरे कुठं कुठं आणि कुणासाठी कशी वर्णी लावून सिध्दीविनायक गणपती पासून ते थेट आंध्रातील व तामिळनाडू जनतेचा दिनदयाळू श्री . बालाजी देवस्थानवर सुद्धा आपला खोडरबरचा स्टॅंम्प उठवून रिकामे होतील याचा काही नियम नाही , माझ्या मते हे सगळे देवदेवतांच्या चापलुसितून अक्षरशः भडवेगिरी करतात आणि आपण भक्तगण कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी लाखोंच्या पटीने या देवस्थानाला नतमस्तक होऊन आपल्या स्वकष्टाने कमावलेले अर्थार्जन करत असतो याला काय म्हणावे नाही का ॽ
असो ज्याचा पैसा त्याचा व्यवहार हे प्रमाण जरी ग्राह्य मानल तरी हा चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला इथपर्यंत येवून पोहचला आहे. त्यामुळे ही सगळी अंतर्बाह्य व्यवस्था आता भक्तांनीच बदलली पाहिजे असे माझे मत आहे , प्रत्येक जातीधर्माच्या आचरणात देवाचा पैसा हा अतिशय तुच्छ मानला जातो पण जे या पदावर संचालक काय किंवा पदाधिकारी बसले आहेत ते खरे त्या त्या देवाच्या पिंडावरचे नागोबा आहेत तर अशा पिंडावर बसून वारेमाप केवळ दूधच नाही तर मलाई खाणाऱ्या नागोबांना देव का कायमचा डसत नाही हा मला सतावणारा प्रश्न आहे .

ज्याची सत्तेत वर्णी लागत नाही किंवा जो सत्तेत असला तर अतिशय कुरापती काढतो अशा महाभागांना मलाईदार देवस्थानच्या खुर्चीवर अगदी टिळा लावून विराजमान केले जाते आणि मग काय हे टिळाधारी आपली राजकीय अवकात कायम ठेवत त्या त्या देवस्थानच्या कारभारात चपखलपणे लुडबुड करून चांगलीच माया लाटतात आणि वर पुन्हा टिळा आहेच , हां यात केवळ टिळाधारीच नाही तर मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डाच्या करोडो रुपयांच्या जमिनी लाटणारे जाळीदार टोपीवाले सुध्दा आहेत ते तुम्ही चाणाक्ष नजरेने पाहिले तर ते सुद्धा सापडतील पण काय करणार गाय म्हैस तुझीच आहे तर लाठी मारायची कुणाला हा यक्षप्रश्न आहे त्यामुळे सगळं काही ‘ तेरीभी चुप मेरीभी चुप ‘ असा सगळा आतबट्ट्याचा व्यवहार राजरोसपणे सुरू आहे परिणामी अतिशय नावाजलेल्या देवस्थानची आर्थिक गळचेपी होत आहे यावर काय उपाय ? वास्तविक भक्तांनी अशा देणग्या जर प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा अथवा बेघर होम , रिमांड होम , आश्रम शाळा , वसतीगृहे त्याचबरोबर अन्य समाजसुधारक संस्थाना बिनदिक्कत दिल्या तर या देवस्थानांच्या खाबुगिरीतून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो हे तितकेच खरे आहे.

राजाभाऊ त्रिगुणे.
पत्रकार, जेष्ठ लेखक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button