मुंब्रात उध्दव ठाकरे यांना मुजरा करणारा तो पोलिस अधिकारी कोण ?

मुंब्रात उध्दव ठाकरे यांना मुजरा करणारा तो पोलिस अधिकारी कोण ?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 13/11/2023 :
परवाच्या सायंकाळी मुंब्य्रातील एका हाॅटेलमध्ये किंवा अन्य कुठेतरी शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चरणी लवत त्यांना शेकडो लोकांच्या समोर पोलिस गणवेशात मुजरा करून संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आणणारा तो पोलिस अधिकारी कोण याचा शोध राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन अशा तळचाटू अधिकाऱ्याची तत्काळ पोलिस दलातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण असले तळचाटू अधिकारी जर आपल्या गणवेशाचा कोणताही मुलाहिजा ठेवणार नसतील तर असले अधिकारी काय डोंबलाची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार असा प्रश्न उपस्थित होतो.
परवा सायंकाळी शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव हे त्यांच अस्तित्व नसलेल्या शाखेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बुलडोझरच्या साह्याने नांगर फिरवल्याने ठाकरे साहेबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या म्हणून ते खासदार संजय राऊत यांच्यासह शिल्लक शिवसेनेच्या नवरत्नांना घेऊन कधी नव्हे ते मातोश्री सोडून ठाण्यातील मुंब्रा येथील त्या पडिक शाखेची पाहणी करण्यासाठी आले होते. यात या भागातील जैतुदिन नावाचे शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुध्दा अगदीच आघाडीवर होते. आता या जैतुदिन यांना शिल्लक शिवसेनेची शाखा पाडली म्हणून इतका राग अनावर झाला की जसं काही त्या भागातील कथित बाबरी पाडली की काय असा त्यांचा एकूण रुद्रावतार पाहून ते भाकरी जरी शरदचंद्र पवारसाहेब यांची खात असले तरी चाकरी मात्र उध्दव ठाकरे यांची करतात जसं की खासदार संजय राऊत हे याउलट भाकरी उध्दव ठाकरे यांची खातात आणि चाकरी शरदचंद्र पवारसाहेब यांची करतात. अगदी हुबेहूब तसंच .
तर असो आजकाल या उर्वरित शिल्लक शिवसेनेची काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण स्थिती अगदीच बेताची आणि तितकीच केविलवाणी झाली आहे कारण नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उध्दव ठाकरे यांचा गट डायरेक्ट पाचव्या स्थानावर तर शरदचंद्र पवारसाहेब यांचा गट चौथ्या स्थानावर मतदारांनी असा काही उचलून अक्षरशः फेकून दिला आहे. पण त्या निकालाची कारणमीमांसा करण्याऐवजी विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत हे मात्र आपल्या धन्याच्या सूरात सूर मिसळून मर्द असाल तर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून दाखवा अशी आयाळ काढलेल्या सिंहाची मातोश्री बाहेर न पोहचणारी डरकाळी फोडत असतात. वास्तविक शिल्लक शिवसेनेने किमान स्व पक्षीय तरी मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवून दाखवायला काय हरकत होती. पण नाही. कारण यांचे बोलायचे सुळे वेगळे असतात हे आता मतदारांच्या अंगवळणी पडलं आहे.
अशा परिस्थितीत जर लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आणि निवडणूका झाल्या तर शिल्लक शिवसेना व शिल्लक राष्ट्रवादी या दोन पक्षांची इतकी केविलवाणी अवस्था होईल की यांना बहुदा कधीकाळी सद्दाम हुसेन लपलेल्या बिळाचा आसरा घ्यावा लागेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण कोणत्या तोंडाने हे त्यावेळी पराभवाची कारणमीमांसा करणार हेच कळणार नाही. तरीही विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यातून काही थातूरमातूर कारण सांगून आपला राजकीय निर्लज्जपणा सिध्द करतील यात काही शंका नाही. कारण हीच तर त्यांची खरी खासियत आहे. पण हे झाले शिल्लक शिवसेनेचे. तर दुसरीकडे शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून जैतुदीन नावाचे दुसरे विश्व प्रवक्ते अशी भलावण तयार करण्यासाठी
वाकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हुबेहूब राऊत साहेबांची नक्कल करतायंत हे नाकारून चालणार नाही.
तर अशी एकूणच केविलवाणी अवस्था असताना आपला पक्ष सावरण्याऐवजी शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंब्य्रातील शिवसेनेची शाखा पाडली म्हणून त्या अवशेषाची पाहणी करण्यासाठी मातोश्रीवरून आपल्या नवरत्नांना घेऊन मुंब्य्रात परवा सायंकाळी वाजत गाजत फुलांच्या पाकळ्यांची उधळण करुन घेत गेले खरे पण त्या अवशेषाची पाहणी मात्र ते करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी तेथेच राणा भीमदेवी थाटात भाषण करताना ‘ मर्दाची अवलाद असाल तर ‘ पोलिसांना बाजूला ठेवून या समोरासमोर अशी नेहमीची आयाळ नसलेल्या सिंहाची गर्जना केली आणि पुन्हा मातोश्रीवर जाण्यासाठी नावातच ‘यु ‘ असल्यामुळे ‘ यु ‘ टर्न घेतला. तर दुसरीकडे याचझ कालावधीत मुंब्य्रातील जैतुदिन नावाच्या आमदाराने बिन पैशात संपूर्ण दिवसभर आपला राजकीय मारुती करून प्रचार करुन घेतला हेही तितकंच खरं आहे.
ते जाऊद्या याच काळात मुंब्य्रात ठाकरे आले असताना कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडू नये म्हणून तेथे उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ठाकरे यांच्या चरणी लवत त्यांना शेकडो लोकांच्या समोर चक्क मुजरा केला आणि महाराष्ट्रातील पोलिस सत्तेच्या गुलामांपढे किती लाचार झाले आहेत हे देशातील जनतेला दाखवून देत महाराष्ट्र पोलिसांचे दिवसाढवळ्या अक्षरशः धिंडवडे काढले. आणि याच चित्रण शेकडो वेळा टी . व्हि .9 ने आपल्या प्रेक्षकांच्या माथी मारून नवा धाडसी पराक्रम केला त्यामुळे टी. व्हि .9 व त्या मुजरा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा जाहिर सत्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या टेंभी नाका चौकात घेतला पाहिजे त्यातून हे सरकार आणि त्यांचे पोलिस अधिकारी उध्दव ठाकरे यांच्यापुढे किती लाचार झाले आहेत हे तरी एकदा जनतेला कळेल तुर्तास एवढेच.
राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक