ताज्या घडामोडी

तरुण भारत संवाद च्या “दुर्गाशक्ती” पुरस्काराने श्रीमती जगूबाई जानकर सन्मानित

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 10/11/2023 : सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या टिळक स्मारक सभागृहात तरुण भारत संवाद च्या “दुर्गाशक्ती” पुरस्काराने श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांना सन्मानित करण्यात आले.व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दैनिक तरुण भारत चे संस्थापक संपादक कै .बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि तदनंतर दीप प्रज्वलनाने पुरस्कार सन्मान सोहळ्याचे उद्घाटन झाले.

तरुण भारत संवाद मीडिया परिवाराच्यावतीने तरंगफळ ग्रामपंचायतच्या विद्यमान ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जगूबाई मारुती जानकर (महाराष्ट्र शासनाचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” प्राप्त)  यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करीत असलेल्या विविध क्षेत्रातील दहा महिलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. जिल्हा शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे व ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्या हस्ते हा “दुर्गामाता सन्मान पुरस्कार2023” वितरण सोहळा थाटाने संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे लोकमान्य को-ऑप.बँकचे शाखा व्यवस्थापक सुरेश वडगावकर, तरुण भारत संवाद संपादक विजयकुमार देशपांडे, युवाशक्ती आघाडीचे प्रियदर्शन साठे, जाहिरात प्रमुख सुरेश बद्रे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या पुरस्कार सन्मान सोहळ्यामध्ये श्रीमती जगुबाई जानकर यांच्यासह पंढरपूर येथील श्रीमती पुष्पलता निकम, पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्य सौ. नागरबाई साठे, सौ.प्रतिभा गोफणे (महिला शहराध्यक्ष भाजपा कुर्डूवाडी), सोलापूर शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. पुनम गोरे नामदे, सौ. तेजाबाई मिटकर (सरपंच वागदरी तालुका तुळजापूर), डॉ. वर्षा काणे (स्त्री रोग तज्ञ पंढरपूर), कु. शितल म्हेत्रे (संस्थापिका अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशन अक्कलकोट), डॉ. अमिता कोरके (सचिव  जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूर वैराग), प्रा.डॉ. मुमताज शेख (ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर) इत्यादी विविध क्षेत्रातील नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यासाठी माळशिरस तालुक्यातील रत्नप्रभादेवी मोहीते पाटील बहुद्देशीय सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख जानकर, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, जांभूड ग्रामपंचायत माजी सरपंच पांडुरंग नायकुडे, महापारेेेषण सोलापूर सहाय्यक अभियंता सागर बनसोडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय हुलगे, सुजीत तरंगे, पत्रकार सौ. शोभा तानाजी वाघमोडे, भानुदास जानकर, विजय जानकर , रेखा खताळ, छायाचित्रकार शशिकांत म्हमाणे, जेष्ठ पत्रकार अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता, aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button