विठ्ठल कॉर्पोरेशन प्रती मे.टन २७००/- रुपये दराने पहिला हप्ता देणार – आमदार संजयमामा शिंदे

विठ्ठल कॉर्पोरेशन प्रती मे.टन २७००/- रुपये दराने पहिला हप्ता देणार –आमदार संजयमामा शिंदे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 9/11/2023 : सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल कॉर्पोरेशन लि.म्हैसगांव ता.माढा, याआपल्या साखर कारखान्याचे विस्तारीकरण अल्प कालावधीमध्ये पूर्ण करुन कारखान्याचा 16 वा गाळप हंगाम सन 2023-24 सुरळीतपणे सुरु झालेला आहे. तसेच ऊस तोडणी वाहतुक यंत्रणाही कारखान्याकडे पुरेश्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे. यंदा गाळपास येणाऱ्या ऊसासाठी पहिला ॲडव्हान्स हप्ता विठ्ठलराव शिंदे सह. सा. का. लि. पिंपळनेर या कारखान्याप्रमाणेच प्रती मे.टन 2700/- रुपये प्रमाणे सभासद व बिगर सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा करणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.
या प्रसंगी विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, मुख्य कार्यकारी आर. एस. रणवरे, कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिलडा, असि. जनरल मॅनेजर वैभव काशिद, चिफ इंजिनिअर मोहन पाटील, चिफ केमिस्ट प्रदीप केदार, डिस्टीलरी मॅनेजर अनिल शेळके, मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे, मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर, परचेस अधिकारी कल्याण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील, एच. आर. मॅनेजर परमेश्वर माळी, सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह विठ्ठल कॉर्पोरेशन मधील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.