सुप्रभाताई आता तुमचा सुर्य मावळतीला आलाय

सुप्रभाताई आता तुमचा सुर्य मावळतीला आलाय
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 6/11/2023 :
तुमच्या आमच्या आवडीच्या प्रिय भगिनी खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा राजकीय सुर्य मावळतीला आलाय हे त्यांना स्वतःला माहित असूनही त्या आता नको त्या ठिकाणी आपली उठाठेव करून त्यांचीच अवहेलना करून घेत आहेत. कारण काय तर म्हणे माझा अजितदादा एकाच ताटात जेवला पण सध्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दवजी ठाकरे यांचे कर्दनकाळ देवेंद्रजी फडणवीस यांनी ऐनवेळी नको ती फडफड करून आमच्या भावा बहिणींच्या नात्यात ( परत ) राजकीय विष कालवल .
काय फालतू आणि कोणत्याही लोकशाही तत्वांवर न टिकणारा तकलादू आणि निष्काम उपयोगी खोटा आरोप आहे असं माझं मत आहे किंवा त्याहूनही बाकी काही नाही. कारण काय आहे यासंदर्भातील लिखाणात आणि भाषणात फार बडबड किंवा त्याहूनही बाष्कळपणा करून फारच शब्दांची बोट मोडावी लागतात. असो असं ताईसाहेबांना मुळात वाटत नाही कारण विषय असा आहे की सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे या ज्या त्यांच्या चुलत भाऊ असणारे सध्याचे उपमुख्यमंत्री व जगविख्यात कथित महा भ्रष्टाचारी अजितदादा पवार यांना चार – दोन आमदार असलेल्या पक्षांच्या राष्ट्रीय नसलेल्या पदावरून काढून काय सल्ला देतात की अकेला देवेंद्र क्या करेगा ? अहो ताईसाहेब तुम्हाला माहीत असतानाही तुमची सगळीच्या सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखंड शिवसेनेची विल्हेवाट लावण्यासाठी हाच देवेंद्र कारणीभूत होता. परिणामी यापुढेही तुम्ही फक्त राजकीय भोवरे आहात कारण तुम्ही बोलेल ती भाषा ही आता समाजात असह्य होत चालली आहे. त्यामुळे तुम्ही ठाण्याच्या पोपटपंच्याला ठाण्याच्या हद्दीतच राहुदया हो ! ताईसाहेब नाही तर तुमचा बारामतीचा राजकीय पसारा उचलायला तुमचेच रक्ताचे नाते असलेले चुलत भाऊ अजितदादा पवार तुमच्यासाठी लोकसभा निवडणुकीत काय पराक्रम करणार आहेत हे विसरू नका. कारण त्यांनी तुमच्याच बारामतीच्या तालुक्यातील कोणत्यातरी ऊसाच्या फडात मोळी टाकण्यासाठी हवस नवस न पाळता त्यांच्याच पत्नीला पाठवून लोकसभा निवडणुकीपूर्वी वेगळा सिग्नल दिला हे वेगळं सांगायची गरज नाही .
आता राहिला प्रश्न आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा तो आजच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बऱ्यापैकी स्पष्ट झाला आहे. कारण तुमच्या पिताश्रींनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इतकी त्रेधातिरपीट झाली आहे की काय विचारूच नका. आजच्या घडीला भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले आहेत तर तुमचा पक्ष अगदीच तळापर्यंत गेला. हे कशाचे द्योतक आहे याचाही विचार करावा. मग कळेल की अकेला देवेंद्र फडणवीस ही काय चीज आहे ती. कारण देवेंद्र फडणवीस हे जरी जातीने ब्राह्मण असले तरी ते मराठा समाजासाठी उजवे आहेत हेही तितकंच खरं आहे .
राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार, राजकीय विश्लेषक.