खंडणी व अपहरणाच्या गुन्हयातून आरोपीची निर्दोष मुक्तता
खंडणी व अपहरणाच्या गुन्हयातून आरोपीची निर्दोष मुक्तता
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
सोलापूर प्रतिनिधी : अपहरण करुन ३० हजार रुपये खंडणी मागून मारहाण केले प्रकरणी सुरेश बसप्पा प्याटी, रा. सोलापूर यांची न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (म्युनिसिपल कोर्ट) श्रीमती दिप्ती कोळपकर यांनी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी की,
फिर्यादीस जबरदस्तीने उचलून नेवून जुना पुना नाक्याजवळील समर्थ हॉटेल मधील रुम क्र. ११२ मध्ये नेवून रुमचा दरवाजा बंद करुन आतून कडी लावून शिवीगाळ दमदाटी करुन नुकसानीपोटी ३० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली व लाथा बुक्क्याने मारहाण करुन जखमी केले अशी फिर्याद मधुकर मार्गम यांनी जेलरोड पोलीस स्टेशनला दिली होती.
अभियोग पक्ष हा आरोपीवरील दोषारोप संशयापलीकडे सिध्द करण्यास अपयशी ठरला आहे, फिर्यादीची साक्ष त्याच्या केसशी सुसंगत नाही, ओळख परेड घेण्यात आलेली नाही, मारहाणी संदर्भात आवश्यक पुरावा या अभिलेखावर आलेला नाही. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आलेले नाहीत, वगैरे युक्तीवाद आरोपीचे वकील ॲड. शरद पाटील यांनी केली. सदर युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला व आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीच्यावतीने ॲड. शरद पाटील, ॲड. प्रसाद काशिद, ॲड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.