श्रीपाद सेवा मंडळ संग्रामनगर तर्फे नम्र आवाहन
श्रीपाद सेवा मंडळ संग्रामनगर तर्फे नम्र आवाहन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 1/11/2023 : संग्राम नगर येथील श्री.दत्त मंदिर, लोणकर वस्ती परीसरात, श्रीराम गुरुकुल या नावाने सध्या गुरुकुल कार्यान्वीत आहे. शालेय शिक्षणाबोबरच ५ वी ते १२ वीतील मुलांना टाळ ,पकवाज, पेटी बरोबरच मुलांना हरी पाठ, भजन, किर्तनाचे शिक्षण दिले जात आहे. सर्व मुले गरीब घराण्यातील असून, बरेच दानशूर भक्त आपले स्वतःचे किंवा लग्नाचे वाढदिवसाला किंवा मुला मुलींचे वाढदिवसा बरोबरच आई वडीलाचे स्मरणाप्रित्यर्थं मुलांना जेवणाची पंगत देत आहेत.
मुलांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्यासाठी आळंदी येथून प्रशिक्षण घेतलेले अंगद महाराज हजारे हे शिक्षक आहेत. सद्या गुरुकुलात २५ विद्यार्थी असून एका पंगतीचा खर्च फक्त १६५०/- रुपये इतका आहे.
आपणास विनंती की आपली पंगत देण्याची इच्छा असल्यास स्वतः गुरुकुल मध्ये भेट देऊन किंवा अंगद महाराज हजारे यांचेशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा ही नम्र विनंती.
7350801666.
8329523423
आपला नम्र
दिलीप गजानन लोणकर
संग्रामनगर,अकलूज.