‘ मॅडम कमिशनर ‘ च्या आत्मचरित्रातील पवार कुटुंबाची आत्मगाथा

‘मॅडम कमिशनर’ च्या आत्मचरित्रातील पवार कुटुंबाची आत्मगाथा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 16/10/2023 :
काय मजेशीर आहे या लेखाच शिर्षक. यातून आपणास या लेखाचा सार काय असेल याचा बोध होईल. कारण अजितदादा पवार यांनी पुणे जिल्हाचे पालकमंत्रीपद स्विकारायला आणि तेरा वर्षापूर्वी पुण्याच्या पोलिस आयुक्त असलेल्या मीरा चढ्ढा बोरवणकर यांनी स्व लिखित जे ‘ मॅडम कमिशनर ‘ नावाने अडतीस प्रकरणाच आत्मचरित्र लिहिले ते प्रकाशित व्हायला एकच वेळ कशी असेल याचा अर्थ कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा जो जुमला असतो तसाच हा जुमला आहे. मीरा बोरवणकर यांच हे आत्मचरित्र महाराष्ट्रातील राजकारणात मागील तीन दिवसांपासून कळीचा मुद्दा होऊन गेला आहे त्यामुळे अनेक जण आपापल्या बुध्दीचे तारे तोडत तोडत शरदचंद्र पवारसाहेब यांनीच आपल्या पुतण्याचा राजकीय गेम केला असल्याची शक्यता बेमालूमपणे वर्तवत आहेत. अर्थात यात काही तथ्य नाही असे म्हणण्याच धाडस मी तरी करणार नाही. कारण तसा शरदचंद्र पवारसाहेब यांचा राजकीय इतिहास आहे. पण जर असं काही झालंच असेल तर अजितदादा पवार गटाचे सध्याचे म्होरके माजी केंद्रीय मंत्री व एकेकाळचे पवारसाहेबांचे आर्थिक उलाढालीतील उजवे हात असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनी जर साहेबांच्या राजकारणाचा पर्दाफाश करणारे एखादं पुस्तक लिहिलं तर देशात मोठा गहजब होईल यात काही शंका नाही .मीरा चढ्ढा बोरवणकर यांचा त्यांच्या पोलिस सेवेतील असणारा प्रामाणिकपणा अतिशय निष्कलंक आहे. त्यामुळे त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य पूर्ण केले. परिणामी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा नेत्याला ‘हम करे सो’ याला केराची टोपली दाखवली म्हणून त्या धाडसी पोलिस अधिकारी म्हणून आजही आपला नावलौकिक राखून आहेत. वास्तविक नवरात्रात महिलांचा जागर चालू असतो. याच काळात ‘ मॅडम कमिशनर ‘ नावाच बोरवणकर यांच खळबळ उडवून देणार आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. त्यामुळे समस्त महिलांना समाजात मोठ मानसिक बळ मिळेल. परिणामी महिलांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे मला वाटते. असो , अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी बोरवणकर मॅडम पोलिस कमिशनर होत्या. तो काळ तेरा वर्षापूर्वीचा . अजितदादांचा स्वभाव म्हणजे हाती घेतलेल्या कामाचा निपटारा लागलीच झाला पाहिजे. असा असल्याने त्यांनी त्यावेळचे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्याकडे येरवड्यातील पोलिसांच्या वसाहतीसाठी आरक्षित असलेल्या तीन एकर जमिनीचा लिलाव अजून का झाला नाही? अशी विचारणा करताच बंड यांनी बोरवणकर मॅडम या त्यावर स्वाक्षरी करत नसल्याने हे प्रकरण अर्धवट आहे असे सांगितले .
यावर दादांनी बोरवणकर यांना तातडीने बोलावून घेतले आणि शाहिद बलवा आणि राजू अग्रवाल यांनी तर सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे मग अडचण काय ? अशी विचारणा केली असता बोरवणकर यांनी माझ्या पूर्वीचे कमिशनर सत्यपाल सिंह यांनी हे प्रकरण त्यांच्या काळात का पूर्ण केले नाही ? त्यामुळे मला याचा सखोल तपास करावा लागेल असे तडकाफडकी उत्तर दिले. त्यावर अजितदादांनी ती फाईल टेबलावर आपटून आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर हा चोरीचा मामला तत्कालीन गृहमंत्री आर . आर . पाटील यांच्याकडे गेला. त्यावेळी मॅडम तुम्ही यात पडू नका असा खरमरीत सल्ला बोरवणकर यांना दिला. त्यानंतर दादांनी आर.आर. यांना आपल्या भाषेत सुनावलं. ती भाषा येथे न सांगण्यासारखी आहे असं बोरवणकर यांच मत आहे. वास्तविक बारामतीच्या पवार कुटुंबातील सदस्यांनी विकासाच्या नावाखाली अख्खा पुणे जिल्हा गिळंकृत केला आहे असा विरोधकांचा फार पूर्वीपासूनचा बोलबाला आहे. त्यामुळे अजितदादांना सतत पुणे जिल्हाचे पालकमंत्रीपद हवं असतं. त्यातून मग ‘ पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ‘ हे दुष्टचक्र सुरूच राहील याची पवार कुटुंब काळजी घेत असतात. येरवड्यातील तीन एकर जागा ज्यांना द्यायची होती ते शाहिद बलवा आणि राजू अग्रवाल हे पवार कुटुंबाशी संधान बांधून होते. त्यामुळे हा सारा खटाटोप सुरू होता. पण बोरवणकर यांच्यापेक्षा येरवडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक वजीर शेख यांनी या बलवा आणि अग्रवाल यांची कुंडली शोधली त्यावेळी हे दोघेही केंद्रातील 2 -G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दादांची दादागिरी आयतीच मोडून पडली. अर्थात अजूनही हे दोघे तुरुंगात आहेत. पण यात शरदचंद्र पवारसाहेब यांचा आतून बाहेरून किंवा वरून खालून हात असल्याचे अजिबात सिद्ध झाले नाही. तथापि कायद्याच्या कचाट्यातून पवार कुटुंब कितीही सुरक्षित असल तरी नैतिकतेच्या दरबारातील सुरक्षेचं काय ॽ इतकं सारं असूनही पुतण्याने आपल्याला टांग मारुन जो आपला राजकीय मारुती केला आहे त्यामुळे पवारसाहेबांनीच पुण्यातील जमिनीचा साप बोरवणकर यांच्या काठीने झोडपून काढण्याचा प्रयत्न केला आहे का ॽ अशी शंका येते. कारण या प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राची वेळ बरंच काही सांगून जाते. अर्थात मॅडम बोरवणकर म्हणतात एका वर्षापासून या पुस्तकातील तांत्रिक बाबी व शुद्ध लेखनाच काम चालू होतं खरं काय हे तुम्हीच ठरवा.
राजाभाऊ त्रिगुणे.
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक