ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी मध्ये ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता दिन साजरा

ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी मध्ये ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता दिन साजरा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 17/10/2023 :
महिला व मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी मार्फत ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता दिन साजरा करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात चालणारी आंतरराष्ट्रीय आरोग्य मोहीम ज्याची जागतिक जागरूकता वाढण्याचा उद्देश आहे जागतिक स्तरावर स्तनाच्या कर्करोग हा स्त्रियांना प्रभावित करणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे .
ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जागरूकता जीव वाचवू शकतो कारण अनेक केसेस बरे होण्यासाठी खूप उशिरा आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 28 पैकी एका भारतीय महिलेला त्याच्या आयुष्यात स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तर दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान होते. दर तेरा मिनिटांनी एका महिलेचा स्तनाच्या कर्करोग आणि मृत्यू होतो या सर्वांचे गांभीर्य ओळखून महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनींना या कर्करोगा विषयी जागरूकता, निदान , उपचार करण्यासाठी महाविद्यालयामार्फत स्त्री रोग तज्ञ डॉ.मनीषा शिंदे यांचे स्तन कर्करोगा विषयी जागरूकता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी लवकर तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये स्व तपासणी डॉक्टरांकडून क्लिनिकल तपासणी आणि वयाच्या 40 व्या वर्षी बेसलाईन कॅन्सर 35 व्या वर्षीय नियमित मॅमोग्राफी चा समावेश होतो .
या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर मनीषा शिंदे म्हणाल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये फळे पालेभाज्या युक्त कमी चरबीयुक्त आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे तसेच रोजच्या आहारामध्ये दूध दही तुपाचा देखील योग्य प्रमाणात समावेश केला पाहिजे निरोगी वजन राखण्यासाठी तणाव दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे देखील अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त आहे .
या कर्करोगाविषयी थोडक्यात लक्षणे कशाप्रकारे असतात याचीही त्यांनी माहिती दिली .
लवकरात लवकर प्रतिबंधात्मक उपाय केले गेले नाही तर जगाला या आजाराचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो या कार्यक्रमात स्तन कर्करोगा विषयी उपयुक्त माहितीपत्रक विद्यार्थिनींमध्ये वाटप करण्यात आले योग्य वेळी जागरूकता तपासणी उपचार मिळाले तर स्त्रियांना याचा धोका कायम राहणार नाही असेही त्या म्हणाल्या या कार्यक्रमात विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग व ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी च्या महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग च्या प्राचार्या मेरी सुमती असोसिएट प्रोफेसर गुरुप्रीत व इतर प्राध्यापिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका धनश्री हातोळकर यांनी केले. आभार प्राध्यापिका श्वेता कंगळे यांनी मानले.