जिल्हास्तरीय शालेय मैदानी खेळात स.मा.वि.चे घवघवीत यश…!
सुयश झंजे, अथर्व शेळके, अर्जुन शिराळ, वेदांत लावंड, वैभव चव्हाण, सोहम चव्हाण, सुजित रास्ते खेळाडूची बालेवाडी येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय शालेय मैदानी खेळात स.मा.वि.चे घवघवीत यश…!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 16/10/2023 : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोरेगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये १७ वर्षे मुले यांनी ४ x१०० मी. रिले प्रथम क्रमांक, ११० मी अडथळा शर्यत प्रथम क्रमांक, ५ किलोमीटर चालणे प्रथम क्रमांक, तसेच तिहेरी उडी द्वितीय क्रमांक, २०० मी. धावणे द्वितीय क्रमांक, ४०० मी. अडथळा द्वितीय क्रमांक, अशा या खेळामध्ये घवघवीत यश संपादन करुन सुयश झंजे, अथर्व शेळके, अर्जुन शिराळ, वेदांत लावंड, वैभव चव्हाण, सोहम चव्हाण, सुजित रास्ते खेळाडूची बालेवाडी येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
“खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो तसेच मानसिकताही प्रबळ बनते. दररोज किमान अर्धा ते एक तास कोणतातरी खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही घडतो. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. खेळ हा माणसासाठी महत्त्वाचा असून त्यामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते”. असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार करताना व्यक्त केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक उमेश भिंगे, संजय राऊत, भिमाशंकर पाटील, तानाजी शिंदे, भिमराव दुधाळ यांचाही सत्कार केला. सदर कार्यक्रमासाठी उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य रणवरे, पर्यवेक्षक उपस्थित होते. अशा सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, संस्था अध्यक्ष संग्रामसिंह मोहिम पाटील,प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव, सहसचिव, स्थानिक प्रशाला समिती सदस्य, शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.