मौर्य क्रांती महासंघाचे दुसरे राज्य अधिवेशन 27 नोव्हेबर ला जेजुरीत : राजीव हाके
मौर्य क्रांती महासंघाचे दुसरे राज्य अधिवेशन 27 नोव्हेबर ला जेजुरीत :राजीव हाके
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/10/2023 :
मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र जेजुरी या ठिकाणी सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी दुसरे अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
याराज्य अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम होईल 27 नोव्हेबर रोजी सकाळी 7 वा.जेजुरी गडावर ज्योत प्रज्वलित करून, पुजन अभिवादन करण्यात येईल. हे अधिवेशन तीन सत्रात चालणार आहे.
पहिले सत्र सकाळी 9 ते 11 यावेळेत होईल .या सत्रात पाच वक्ते अभ्यासक मान्यवर विविध पाच विषयावर आपले अनमोल विचार व्यक्त करतील.
शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक दृष्टया बौध्दीक समृध्दतेसाठी हे सत्र उपयुक्त ठरणार आहे
दुसरे सत्र, तथा उदघाटन सत्र 11 ते 2 या वेळेत होईल. या सत्रात प्रति वर्षाप्रमाणे दोन राज्यस्तरीय पुरस्कार व वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा आयोजीत केला आहे. या सत्रात उद्घाटक व इतर मान्यवर आपले विचार व्यक्त करतील.
2 ते 2:30 सर्वासाठी भोजन व्यवस्था असेल.
2:30 ते 5 या वेळेत तिसरे सत्र होईल. या सत्रात समाजातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आपले विचार व्यक्त करतील .या अधिवेशनाची अध्यक्षता बलभिम माथेले करणार आहेत.महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील धनगर व बहुजन समाजबांधवानी मोठ्या संख्येने या परिषदेला जेजुरी येथे उपस्थित रहावे असे आवाहन मौर्य क्रांती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजीव हाके यांनी केले आहे. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तनाची मूल्य रूजतात .हे काम आपण सर्वानी थोडा वेळ देवून करण गरजेचं आहे. राज्यभरात या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार मोठया प्रमाणात सुरू आहे.