श्रीपूरमध्ये जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धांचा शुभारंभ

श्रीपूरमध्ये जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धांचा शुभारंभ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/10/2023 : श्रीपूर (तालुका माळशिरस येथील) श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या सोलापूर जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेचे उद्घाटन गणेश हॉल श्रीपूर येथे झाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका शारदा नामदेव पाटील, तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव, कुस्ती क्रीडा मार्गदर्शक मोहन यादव, ओमप्रकाश पवार, जे एफ आय नॅशनल रेफरी, प्राचार्य पांडुरंग बनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी इंदापूर असोसिएशन सचिव संतोष पवार , प्रगतशील बागायदार नामदेव पाटील,
कराटे प्रशिक्षक महादेव ताकतोडे, कोच श्रीकांत चौधरी, वेळापूरचे क्रीडा शिक्षक अजित बनकर, पर्यवेक्षक नवनाथ अधटराव, प्रा.सुनील गवळी, सिताराम गुरव, समन्वयक प्रा.सुधाकर कांबळे, क्रीडा शिक्षक विजयकुमार केचे, शामराव धाराव, महिला क्रीडा शिक्षिका करुणा धाइंजे, हनुमंत मोरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय दोरगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे, सचिव बाळासाहेब भोसले, आदी मान्यवरांच्या हस्ते ज्यूदो मॅटचे पूजन करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला. प्रथम खेळाडूंची नोंदणी करून, वजनाप्रमाणे गट पाडून व लॉट्स पाडून परीक्षकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यूदो स्पर्धा सुरू करण्यात आल्या.
सदर शालेय ज्यूदो क्रीडा स्पर्धा सन 2023-24, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हास्तर शालेय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर, सोलापूर जिल्हा ज्यूदो असोसिएशन व श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीपूर येथे खेळल्या जात आहेत. सदर स्पर्धा दोन दिवस चालणार असून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील ज्यूदो स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सावंत यांनी केले तर आभार सिताराम गुरव यांनी मानले.