ताज्या घडामोडी

हीच ती वेळ…..!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 07/10/2023 :
हेडिंग वाचून तुम्हाला वाटलं असेल की ही पोस्ट उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे किंवा शिउबाठावर असेल तर तसे नाही.एका महत्त्वाच्या क्षणावर ही पोस्ट आहे.
बावीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रथमच शपथ घेतली होती. त्याआधी अटलजी आणि मोदी यांचे संभाषण स्वतः मोदींनी लिहून ठेवले आहे…
“नरेंद्रभाई आप कहाँ हो ?” अटलजींनी फोनवर विचारले.
“शमशान में..” मोदींनी उत्तर दिले…
“वहाँ क्या कर रहे हो?”
“माधवराव सिंदियाजी का प्लेन क्रॅश हुआ था.उनके साथ एक पत्रकारका भी निधन हुआ था. उसके घर आया हूं.सब लोग तो सिंदियाजी के घर गये.मैने सोचा उस पत्रकार के घरवालोंसे मिलू.”
“वहाँ से दिल्ली आ जाओ और मुझे मिलो..”
त्यांना दिल्लीला बोलावले होते कारण गुजरातमधे नेतृत्व बदल करण्याचा निर्णय झाला होता.
तेंव्हापासून आजपर्यंत ते सत्तास्थानी विराजमान आहेत. त्यांच्यावर काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी आणि आता शिउबाठा अशा सर्व विरोधकांनी हल्ले केले आहेत. त्यांची “ताकदवान” इकोसिस्टीम थकली पण मोदींची प्रतिमा मलीन झाली नाही. उलट ती अधिकच उजळून निघाली आहे. मोदींनी या सगळ्यांची विश्वासार्हता पूर्णपणे धुळीला मिळवली आहे.
मिळालेली सत्ता कोणासाठी, कशा प्रकारे राबवायची याचा पक्का विचार त्यांच्या डोक्यात आहे. त्यापासून तसूभरही ते हलत नाहीत.
ज्या पद्धतीने विरोधी पक्ष राजकारण करत आहेत ते भयावह आहे, किळसवाणे आहे आणि देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. अशा परिस्थितीत मोदी २०२९ पर्यंत पंतप्रधानपदी असणे आवश्यक आहे. ते राहतील असेच सध्याचे वातावरण आहे.
हीच ती वेळ ज्या क्षणी भारताचे भाग्य बदलले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

आनंद देवधर
०७/१०/२०२३

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button