ग्राहक समिती चा तंदुरुस्त पोलीस उपक्रम

ग्राहक समितीचा तंदुरुस्त पोलीस उपक्रम
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
मोहोळ प्रतिनिधी दिनांक 02/10/2023 : मोहोळ ग्राहक समितीच्या वतीने पोलीस स्टेशन मोहोळ येथे तंदुरुस्त पोलीस उपक्रम राबविण्यात आला.
दर वर्षी श्री गणेश उत्सवामध्ये शांतता, सुव्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी यांना बंदोबस्त करावा लागतो. त्यावेळी त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या उपक्रमांतर्गत त्यांना पी.आय. विनोद घुगे यांनी आरोग्य विषयी महत्व पटवून देत मार्गदर्शन केले.
ग्राहक समितीचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या उपक्रमामध्ये पोलीस बांधवांना केळी, सफरचंद, चिक्की चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश महिला अध्यक्षा प्रियंका परांडे, जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ, तालुका अध्यक्ष आनंदराव देशमुख, शहर अध्यक्ष दाजी निचळ, मागासवर्गीय समिती जिल्हाध्यक्ष महादेव जाधव, तालुका युवक अध्यक्ष गणेश काकडे, मंगल नाईकनवरे, सारिका गायकवाड, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.