मुस्लिम जोडप्याच्या हस्ते गणपतीची महाआरती 🟢हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक श्री मोरया गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम , 151 रक्तदात्यांनी केले रक्तदान

🟣मुस्लिम जोडप्याच्या हस्ते गणपतीची महाआरती
🟢हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक
श्री मोरया गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
151 रक्तदात्यांनी केले रक्तदान
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State , India.
Mo. 9860959764.
श्रीपूर प्रतिनिधी दिनांक 27/9/2023 :
माळशिरस तालुक्यातील श्रीनाथ नगर बोरगाव येथील श्री मोरया गणेशोत्सव मंडळाने हिंदू मुस्लिम एक्याचं पूर्ण जगापुढे आदर्श उदाहरण ठेवल आहे. सर्वत्र गणपती उत्सव सुरू आहे. गणपती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी मंडळाचे शेजारी असणारे मंडळाचे सदस्य मुस्लिम जोडप्याच्या हस्ते गणपतीची महापूजा करून, गणपतीची आरती करण्याचा मान देऊन समाजापुढे हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण ठेवले आहे. या परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांच्या सण आणि उत्सवासाठी शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जात असतात. सुखदुःखा मध्ये सामील होत असतात.
त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी वायफट खर्चाला बगल देत, सर्वश्रेष्ठ दान रक्तदान हा सामाजिक उपक्रम घेऊन मंडळातील सर्व कार्यकर्ते, दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्यचे कार्यकर्ते, आसपासच्या मित्रांनी व नागरिकांनी मिळून 151 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले आहे. अक्षय ब्लड बँकेने रक्तदान करण्याची चांगल्या प्रकारे सोय केली होती. या मंडळाचे सर्व कार्यकर्ते वैचारिक व मंडळासाठी व सामाजिक उपक्रमासाठी नेहमीच धावून येत असतात. त्यांच्या कार्याचे सर्वच थरातून कौतुक केले जात आहे. गेले 25 वर्षापासून या गणपती मंडळाची स्थापना होऊन प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने या मंडळाचे नाव परिसरामध्ये लौकिक होत असते. गेल्या वर्षी याच मंडळाला आदर्श गणपती मंडळ म्हणून अकलूज पोलीस स्टेशनकडून गौरवले देखील आहे याचाच आदर्श घेऊन यावर्षी देखील त्यांनी समाजापुढे एक वेगळा नवीन ऐक्याचा आदर्श व रक्तदान घेऊन चांगले समाजापुढे उदाहरण ठेवले आहे.