शिक्षण क्षेत्रात मानसशास्त्रीय चाचण्यांना अनन्यसाधारण महत्त्व : एस. बी. नाईक यांचे प्रतिपादन

शिक्षण क्षेत्रात मानसशास्त्रीय चाचण्यांना अनन्यसाधारण महत्त्व : एस. बी. नाईक यांचे प्रतिपादन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
कोडोली, (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) : ” मानसशास्त्रीय चाचण्या आणि समुपदेशन यांमध्ये जवळचा संबंध आहे. समुपदेशनामुळे आपले दोष इतराना दिसतील, या भीतीपोटी काहीजण मानसशास्त्रीय चाचण्यांकडे दुर्लक्ष करतात. तथापि, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात मानसशास्त्रीय चाचण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असे प्रतिपादन हिरलोक, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील शिवाजी विद्यालयातील सेवानिवृत्त पर्यवेक्षक एस. बी. नाईक यांनी केले. त्यांनी येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी – शिक्षकांवर मानसशास्त्रीय चाचण्या घेतल्या. त्याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
प्राचार्य डॉ. पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ” शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर मानसशास्त्रीय चाचण्यांचे व्यवस्थापन केल्यास त्यांना विद्यार्थ्यांमधील व्यक्तीभेद समजण्यास मदत होते. त्यामुळे शिक्षकांनी सातत्याने वर्गात मानसशास्त्रीय चाचण्यांचे व्यवस्थापन करावे.”
विभागप्रमुख प्रा. ए. के. बुरटुकणे यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी काळे यांनी नाईक यांचा परिचय करून दिला. माधुरी पाटील यांनी सूत्रसंचलन केले. राधिका पाटील यांनी आभार मानले.