ताज्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडी तर्फे राज्यातील विविध प्रश्नांबाबत प्रांताधिकार्‍यांना निवेदन

वंचित बहुजन आघाडी तर्फे राज्यातील विविध प्रश्नांबाबत प्रांताधिकार्‍यांना निवेदन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 21/9/2023 : वंचित बहुजन आघाडी तर्फे राज्यातील विविध प्रश्नांबाबत अकलूज येथे प्रांताधिकार्‍यांना आणि अकलूज पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आहे व तो समाज आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्या मेंढपाळा व्यवसाय घेऊन भटकंती करत असतो आर्थिक सामाजिक दुर्बलता या समाजामध्ये दिसून येत आहे. धनगर हा मोर्चा धनगर नसून हा धनगड आहे राज्य सरकारने धनगर समाजाला धनगड म्हणून आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर करावी व धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. त्याचबरोबर मराठा समाज गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षणाचा लढा घेऊन महाराष्ट्रामध्ये कित्येक मोर्चे काढले मराठा समाजामध्ये आठ लाख वार्षिक उत्पन्न त्याहीपेक्षा कमी असलेले समाजामध्ये घटक आहेत आरक्षण मिळावे म्हणून कित्येक 58 मोर्चे 59 तरुणांनी आत्महत्या आरक्षण मेळाव म्हणून केल्या.

अकलूज पोलीस निरीक्षक दिपरतन  गायकवाड यांना निवेदन देताना घेतलेले छायाचित्र

2019 सरकारने मराठा समाजला आरक्षण राज्यसरकारने जाहीर केले परंतु ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या हलगर्जीपणामुळे टिकलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकावं व मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने विशेष समिती गठीत करून प्रयत्न करावेत व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.

महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली परंतु राज्यातील काही जिल्हे अजूनही पावसाच्या अपेक्षेमध्ये आहेत. विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही भागांमध्ये पावसाने अद्याप पर्यंत हजेरी लावलेली नाही. म्हणून इथला शेतकरी , इथला शेतमजूर अडचणीत आलेला आहे. भकास शेती जमीन भेगा पडलेले आहेत. गुरांना चारा मिळण्याचं मुश्किल झालेला आहे. पाणी मिळणे मुश्किल झालेला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. म्हणून राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेता त्वरित सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करावा व इथल्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या व्यथांची जाणीव ठेवून प्रश्न मार्गी लावावेत.
या सर्व राज्यातील प्रश्नांना घेऊन माळशिरस तालुक्याच्या व जिल्ह्याच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी अकलूज येथे उपविभागीय दंडाधिकारी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी असे निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.


यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय कोकणे, शांतीलाल साळवे, पांडुरंग केंगार, श्रीकांत सावंत, अकलूज शहराध्यक्ष सुनील कांबळे, शहर उपाध्यक्ष मनोज जगताप, माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदीप सरवदे, योगेश गायकवाड, चांदापुरी शहराध्यक्ष अक्षय देठे, अमोल जगताप, सुनका जाधव, बाळासाहेब गायकवाड, रमेश साळवे, उमेश जगताप माळीनगर, गजेंद्र वजाळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button