त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रमुख पाहुणे “रुस्तम-ए-हिंद” सतपाल सिंह

त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रमुख पाहुणे
“रुस्तम-ए-हिंद” सतपाल सिंह
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13 जानेवारी 2025 : स. म. शंकरराव मोहिते जयंती समारंभ समिती, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘शिवतीर्थ’ आखाडा येथे सालाबादप्रमाणे त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, स्पर्धा प्रमुख सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वात भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे मल्ल, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, “रुस्तम-ए-हिंद” भारतीय कुस्तीगीर सतपाल सिंह उपस्थित राहणार असून त्यांनी आपल्या कुस्तीच्या कारकिर्दीत भारताला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करून दिले आहेत. १९७४ मध्ये त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत तर १९८२ मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १६० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. त्यांच्या कुस्तीतील कार्यास १९८३ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. सतपाल सिंह यांनी अनेक कुस्तीपटूंना प्रशिक्षण दिलं. त्यांचे शिष्य सुशील कुमार हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कुस्तीपटू आहे, ज्याने ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकली आहेत.