७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरा
७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 15/8/2023 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च , शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि . १५/०८/२०२३ रोजी भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ . राजकुमार मोहनराव देशमुख प्रादेशिक परिवहन अधिकारी , सोलापूर जिल्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी प्रास्ताविकामध्ये प्रमुख अतिथींचा परिचय करून देत महाविद्यालयाची थोडक्यात माहिती सांगितली.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी थोर क्रांतीकारकांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थी चि. शिवतेजसिंह मानेदेशमुख व कु. पुनम बिटे यांनी भाषणाद्वारे सांगितली. मुख्य अतिथी डॉ. राजकुमार देशमुख यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये अकलूज तसेच सोलापूर जिल्हयाच्या योगदानाची माहिती दिली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांचे मोलाचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी व्यावसाय शिक्षण घेवून पुढे विविध खात्यामध्ये जावून देशसेवा केली पाहिजे असे देखील सांगितले.स्वातंत्र्य दिनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य ॲड. विजयसिंह मगर, प्रथम स्किल एज्युकेशन फाउंडेशनचे सेंटरहेड प्रा. अतुल मोरे, कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख, सर्व विभागाचे विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. श्रीकांत कासे यांनी केले .