रत्नत्रय शैक्षणिक संकुला मध्ये पर्युषण पर्व सुरू

रत्नत्रय शैक्षणिक संकुला मध्ये पर्युषण पर्व सुरू
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 19/9/2023 :
रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे (ता. माळशिरस जि.सोलापूर) मध्ये मंगळवार दि 19 सप्टेंबर 2023 पासून पर्युषण पर्व सुरू झाले आहे. 2008 पासून या शाळेत हे पर्युषण पर्व संस्थेचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी यांच्या मार्गर्शनाखाली साजरे केले जाते. पर्युषण पर्वाचा मुख्य उद्देश म्हणजे आत्मा शुद्ध करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. भगवान महावीरांच्या आयुष्याच्या प्रभावाने पर्युषण उत्सव साजरा होऊ लागला. असे मानले जाते की ज्या काळात भगवान महावीरांनी शिकवण दिली त्याला पर्युषण पर्व म्हणतात. सत्याच्या मार्गावर चालायला शिकवते.
पहिल्या दिवशी नातेपुते येथील धवल गांधी आणि रणदिवे यांनी उत्तम क्षमा या धर्माविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर प्रसंगी बोलताना गांधी म्हणाले ” एखाद्याने आपले मन दुखावले, मनाविरुद्ध केले, ऐकले नाही तर आपल्याला राग येतो. मग शब्दाने शब्द वाढून बदल्याची भावना होते. अनेक जन्म दोघांचे त्यातच खर्ची होतात. जसे पार्श्वनाथ भगवान व कमठचे बरेच जन्म वैर भावनेतच गेले. यापेक्षा समोरच्याला त्याची चूक समजून सांगून त्याला क्षमा करणे मग तो लहान असो वा मोठा. हा धर्म म्हणजे घाबरटपणा नाही. याला मोठे मन लागते. म्हणूनच म्हटले आहे, “क्षमा विरस्य भूषणम्”
जैन पर्युषण पर्व दरवर्षी १० दिवस पाळला जाते. आत्म्याच्या १० धर्मांना या १० दिवसांत प्रकट करून ‘आत्मशुद्धी’ करण्याची ही संधी असते. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असते. आजपासून पुढील दहा दिवस हा पर्वकाळ सुरू राहील.
कोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होवून त्याची वैचारिक बैठक चांगली रहाते. शिवाय यामुळे पुण्यार्जन होवून मोक्ष मार्गही प्रशस्त होतो. जसे १० दिवस गणेशोत्सव, ९ दिवस नवरात्र, २५ ते ३१ नाताळ तसा जैन समाजाचा हा १० दिवसांचा पर्वकाळ म्हणजे एक धार्मिक सोहळा असून, सर्वजण पुण्यार्जनाचा लाभ घेतातच. पर्युषण म्हणजे उपासना, जी स्व:कल्याणासाठी केली जाते. आत्मकल्याण म्हणजे मोक्षप्राप्तीचे ध्येय! हे फक्त मानवी जिवनातच शक्य आहे. इतर एकेंद्रिय, द्विइंद्रिय त्रीइंद्रियांना नाही. जैन शास्त्राप्रमाणे तर स्वर्गातील देवांनाही पुण्याक्षयाने शेवटी मानवी शरीर धारण करूनच धर्माचरणाने ‘मोक्ष’ मिळवता येते. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे , यावेळी समन्वयक अमित पाटील, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.