श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या श्री गणेश मूर्तीची स्थापना

श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या श्री गणेश मूर्तीची स्थापना
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 19/9/2023 : शंकरनगर – अकलूज येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या श्री गणेश मूर्तीची स्थापना सकाळी नऊ वाजता मंडळाचे ट्रस्टी अॕड. नितीन खराडे व सौभाग्यवती शर्मिला नितीन खराडे यांच्या हस्ते धार्मिक विधी सह करण्यात आली.
या मंडळाचे हे 57 वे वर्ष आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे या मंडळाचे सुरुवातीपासूनचे अध्यक्ष आहेत.
स्थापनेपूर्वी सकाळी कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून जिमखाना इमारतीपर्यंत श्री गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये हलगी, लेझीम, टाळकरी ,बँड पथक व लहान मुलांचे पारंपरिक खेळ लाठीकाठी, तलवारबाजी खेळ खेळले गेले. यावेळी हजारो नागरिक उपस्थितीत होते.
स्थापना पूजेचे मंत्र पठण व विधी प्रसाद कुलकर्णी व त्यांचे सहकारी प्रसाद भागवत यांनी केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील कारखान्याचे संचालक अॕड. प्रकाशराव पाटील, नानासाहेब मुंडफणे, राजेंद्र शिंदे, रणजित रणवरे, पांडुरंग एकतपुरे, गोविंद पवार, दतात्रय चव्हाण, बाळासाहेब माने देशमुख याचबरोबर मंडळाचे ट्रस्टी लक्ष्मण आसबे, चंद्रकांत कुंभार, श्रीकांत राऊत ,फातिमा पाटावाला, शहनाज शेख, तुकाराम जाधव, सचिव अभयसिंह माने देशमुख कारखान्याचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते. या मंडळाने सर्व नियमाचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचे योजले असून दररोज सकाळी संध्याकाळी श्री गणेशाची आरती होणार असून प्रसाद वाटप होणार आहे.